AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या देशात फोन, सायकल आणि लगेज लॉक न लावता ठेवतात, कारण रंजक

एका व्यक्तीने या देशातील दौरा केला तेव्हा त्याला जो अनुभव आला त्याला त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्याची पोस्ट वाचून लोक या देशाची विश्वासार्हता आणि इमानदारीचा दाखला देत आहेत लोक...

या देशात फोन, सायकल आणि लगेज लॉक न लावता ठेवतात, कारण रंजक
CELLPHONE
| Updated on: Jun 22, 2026 | 9:24 PM
Share

आजच्या कलियुगात तुमचे पाकिट आणि मोबाईल कधी प्रवासात लंपास होईल याची गॅरंटी नसते.लोकल ट्रेनच्या प्रवासात सतत आपले लक्ष पाकिट आणि मोबाईलच्या सुरक्षेकडे असते. अशा या घोर कलियुगात देवस्थानातील गर्दीत, मोठ्या सोहळ्यात, जेथे गर्दी जमते तेथे पाकिटमार हमखास हातसाफ करुन जातात. मात्र, एक देश असा आहे ज्या देशात फोन, सायकल आणि बॅग सामान लोक लॉक न लावता सोडून देतात. तरी त्यांची चोरी होत नाही.सोशल मीडियावर या देशाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. युजर्स त्यावर अनेक कमेंट करत आहेत.

या एका व्यक्तीने सांगितले की गेल्या एक महिन्यांपासून पत्नी आणि मुलीसोबत ते दक्षिण कोरियात रहात आहेत. त्यांनी लिहिलेय की जर एखाद्या दुकानात वा रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गेला तर बेबी स्ट्रोलर बाहेरच सोडून जातात. एकदा ते त्यांच्या मित्रासह एकत्र लंचला गेले, तेव्हा मित्राने सायकलला टाळा न लावता तशीच सोडली आणि दोन तासानंतर ते आले तेव्हा सायकल तिथल्या तिथे उभी होती.

त्यांनी आणखी एका घटनेचा उल्लेख करताना सांगितले की त्यांच्या एका मित्राचा iPhone पार्कच्या बँच वर विसरुन गेला होता. जेव्हा चार तासांनंतर ते तेथे पोहचले तर त्यांचा फोन त्याच जागेवर सापडला. एवढेच नाही त्यांना एका K-pop कॉन्सर्टच्या बाहेर अनेक लोकांच्या साहित्य कोणत्याही सुरक्षेशिवाय पडलेले आढळले. लोक त्यांचे लगेज मेट्रो स्टेशनच्या बाहेर सोडून आरामात कॉन्सर्टला गेले होते. जेव्हा त्यांनी स्थानिक लोकांना विचारले की तुम्हाला चोरांची भिती वाटत नाही का तर त्यांना उत्तर मिळाले की अखेर कोणी कशाला या वस्तूंची चोरी करले.

पोस्टमध्ये या व्यक्तीने लिहिलंय की दुसऱ्या देशात या स्थितीची कल्पना देखील करणे कठीण आहे. त्यांच्या मते दक्षिण कोरिया सारख्या हाय – ट्रस्ट समाजात कायदा आणि सामाजिक नियमांचे आदर केला जातो. तेथे छोट्या-मोठ्या चोरीला देखील गंभीरतेने घेतले जाते.

युजर काय म्हणाले ?

सोशल मीडियावर या पोस्टवर अनेक लोकांनी निरनिराळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेक युजर्सने म्हटले आहे की दक्षिण कोरियात प्रत्येक ठिकाणी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील लोकांना गुन्हा करण्यापासून रोखतात. तर काही लोकांनी म्हटलेय की अमेरिकेच्या काही छोट्या शहरात देखील लोक न घाबरता बिनधास्त साहित्य उघड्यावर ठेवून जातात.

एक युजर जो गेल्या १० वर्षांपासून द.कोरियात रहात आहे. त्यांनी लिहिलंय की तेथे सर्व काही परफेक्ट नाही. वर्क -लाईफ बॅलन्स आणि एअर क्वालिटीसारख्या समस्या देखील आहेत. मात्र, रात्री बाहेर फिरणे, दरवाजा लॉक करणे वा लॅपटॉप टेबलवर सोडल्यास कोणतेही टेन्शन नाही. हीच गोष्ट तेथे राहण्यास खास बनवते.

आता ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. लोक यावर चर्चा करत आहेत की अखेर कोणा अन्य समाजात एका विश्वास ठेवता येऊ शकतो का ? जेथे लोक त्यांचे साहित्य विना टाळ्याचे सोडून बिनधास्त सोडून देतात.

Follow Us
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण