Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प खूप विचित्र, व्हाइट हाऊसमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा घोर अपमान, समोरचा चिडेल अशी कृती
Donald Trump : राजकीय मतभेद कितीही तीव्र असले, तरी पदावर असताना किंवा राहिलेल्या व्यक्तीचा सन्मान करणं आवश्यक असतं. पण असं करतील ते ट्रम्प कुठले. ट्रम्प यांची व्हाइट हाऊसमधील एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. ट्रम्प बायडेन यांना स्लीपी जो म्हणून टोमणा मारतात. त्यांना अमेरिकेचे सर्वात खराब राष्ट्राध्यक्ष मानतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा माजी राष्ट्रपती जो बायडेन यांच्यावर निशाणा साधला आहे. पण यावेळी बायडेन यांच्यावर निशाणा साधण्याची पद्धत एकदम वेगळी आहे. व्हाइट हाउसच्या वेस्ट विंगच्या बाहेर वॉकवे वर माजी राष्ट्रपतींचे ब्लॅक अँड व्हाइट फोटो लावण्यात आलेले आहेत. पण या प्रेसिडेशियल वॉक ऑफ फेम वर नजर मारली, तर बायडेन यांचं पोर्ट्रेट पाहून दंग व्हालं.व्हाइट हाउसमध्ये रोनाल्ड रीगन पासून बराक ओबामा पर्यंत रिपब्लिकनपासून डेमोक्रेटिक पक्षाच्या सर्व माजी राष्ट्राध्यक्षांचे पोर्ट्रेट आहेत. पण बायडेन यांच्या फोटोच्या जागी ऑटोपेनचा फोटो लावण्यात आला आहे.
ऑटोपेन एक स्वचालित यांत्रिक डिजिटल डिवाइस आहे, कुठल्याही व्यक्तीची स्वाक्षरी ऑटोमॅटिकली अप्लाय करते. हा एक रोबोटिक आर्म किंवा प्रोग्राम्ड पेनच काम करते. मूळ हस्ताक्षराला डिजिटल पॅटर्नमध्ये स्टोर करुन कागदावर तशाच पद्धतीने स्वाक्षरी काढता येते. बायडेन यांच्याबाबतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप केलेला की, बायडेन यांनी शारीरिक क्षमता लपवण्यासाठी ऑटोपेनचा दुरुपयोग केला. त्यामुळे त्यांना कल्पना दिल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेण्यात आलं.
ऑटोपेनचा वापर कशासाठी झालेला?
बायडेन यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या अंतिम महिन्यात 4000 पेक्षा अधिक लोकांना क्षमादान आणि शिक्षा कमी करण्यासाठी ऑटोपेनचा वापर केला. ही संख्या इतकी मोठी होती की, व्यक्तिगत सही करणं अशक्य होतं. ट्रम्प जानेवारी 2025 मध्ये म्हणालेले की, बायडेन यांनी दिलेल्या क्षमादानाच काही मूल्य नाही. कारण या कागद पत्रांवर ऑटोपेनची स्वाक्षरी होती. बायडेन यांना या बद्दल काहीच माहित नव्हतं. बायडेन यांची मानसिक क्षमता लपवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप ट्रम्प यांनी केला.
If ICC has any shame left, they should ban Pakistan cricket for 2 years.
ACC Chairman Mohsin Naqvi openly mocked India by putting this pic intentionally, this is unacceptable
— Space Recorder (@1spacerecorder) September 24, 2025
ट्रम्प यांच्या कार्यकाळात सुद्धा ऑटोपेनचा वापर
बायडेन यांनी जुलै 2025 मध्ये न्यू यॉर्क टाइम्सला मुलाखत दिली. त्यात ते म्हणालेले की, त्यांनी सर्व निर्णय तोंडी घेतले होते. ऑटोपेनचा फक्त स्वाक्षरीसाठी उपयोग केला गेला. कायदेतज्ज्ञांनुसार,अमेरिकन कायद्यात क्षमायाचनांवर ऑटोपेनची स्वाक्षरी एक्जीक्यूटिव ऑर्डर पूर्णपणे वैध आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात सुद्धा ऑटोपेनचा वापर झालेला.
