India-America Deal : कितीही भांडण-तंटे झाले तरी, भारत-अमेरिका परस्परांचे खास मित्रच राहणार, हा घ्या त्याचा मोठा पुरावा

India-America Deal : भारत अमेरिकेपासून लांब होतोय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे संबंध बिघडतायत. भारताची रशिया आणि चीनसोबत दृढ मैत्री होतेय. असं कितीही म्हटलं गेलं, तरी भारत-अमेरिका परस्परांचे खास मित्रच राहणार. त्याचा हा घ्या मोठा पुरावा.

India-America Deal : कितीही भांडण-तंटे झाले तरी, भारत-अमेरिका परस्परांचे खास मित्रच राहणार, हा घ्या त्याचा मोठा पुरावा
India-US
| Updated on: Oct 31, 2025 | 3:13 PM

सध्या भारत-अमेरिकेमध्ये तणाव आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ नितीमुळे भारताने रशिया आणि चीन सोबतची आपली मैत्री दृढ केली. त्यामुळे अनेकांना वाटतय की, भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध पूर्णपणे बिघडले आहेत. पण असं नाहीय. आजही अमेरिका भारताचा खास मित्र आहे. त्याचा एक मोठं प्रमाण समोर आलय. येणाऱ्या दिवसात भारत-अमेरिका संबंध पूर्वी सारखे झालेले दिसू शकतात. भारत आणि अमेरिकेत 10 वर्षांसाठी एक संरक्षण करार झाला आहे. मलेशियाची राजधानी कुआलालंपुरमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी घोषणा केली.

करारानुसार, दोन्ही देश परस्परांना माहितीचं आदान-प्रदान करतील. डीलमध्ये परस्परांना टेक्निकल सहकार्य देण्याची सुद्धा चर्चा झालीय. डिफेन्स डीलवर बोलताना पीट हेगसेथ म्हणाले की, “या प्रकारचा करार यापूर्वी कधी झालेला नाही. आम्ही 10 वर्षांसाठी ही डिफेन्स डील केली आहे. दोघांमध्ये हा निर्णय समन्वय बनवण्याचा प्रयत्न आहे. डिफेन्स डीलचा मुख्य उद्देश क्षेत्रीय स्थिरता कायम ठेवणं आहे. सैन्य समन्वय अधिक दृढ करणं आणि संरक्षण टेक्नोलॉजी सहकार्य वाढवणं हा आहे”

राजनाथ सिंह या डिफेन्स डीलवर काय म्हणाले?

अमेरिका आणि भारतामध्ये झालेल्या या संरक्षण सहकार्य कराराचा थेट परिणाम तुम्हाला हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात पहायला मिळू शकतो. अमेरिकेसोबतच्या या डिफेन्स डीलनंतर राजसनाथ सिंह यांनी एक्सवर पोस्ट केली. राजनाथ यांनी ही नवीन युगाची सुरुवात असल्याचं म्हटलं आहे. डिफेन्स डीलचा हा रोडमॅप भारत-अमेरिका संरक्षण संबंधांना धोरणात्मक दिशा देईल.

जगातील अनेक देशांची चिंता काय?

हिंद-प्रशांत क्षेत्र सर्वाधिक लोकसंख्येचे आणि आर्थिक दृष्ट्‍या सक्रीय क्षेत्र आहे. हिंद प्रशांत क्षेत्रात एकूण चार खंड आहेत. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका. जगातील जवळपास 60 टक्के लोकसंख्या या क्षेत्रात राहते. भारत, चीन आणि अमेरिका हे तिन्ही शक्तीशाली देश या क्षेत्रात येतात. हिंद-प्रशांत क्षेत्रात कधीकाळी पूर्णपणे अमेरिकेचा दबदबा होता. पण चीनने हा दबदबा आता कमी केलाय. चीनने इथे आपली पकड मजबूत करु नये याचीच जगातील अनेक देशांना धास्ती आहे.