AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Pakistan : पाकिस्तानचा पचका, जिथे जाऊन भारताविरोधात रडले, तेच पाच देश डीलसाठी आले नवी दिल्लीत

India-Pakistan : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सिंधू जल करारावरुन भारताविरोधात तक्रार करत फिरत होते. काही देशांनी पाकिस्तानच्या हो ला हो केलं. पण तेच देश आता व्यापार आणि कूटनितीक संबंधांवर चर्चा करण्यासाठी भारतात आले आहेत.

India-Pakistan : पाकिस्तानचा पचका, जिथे जाऊन भारताविरोधात रडले, तेच पाच देश डीलसाठी आले नवी दिल्लीत
India-Pakistan
| Updated on: Jun 06, 2025 | 4:44 PM
Share

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सिंधू जल करारावरुन भारताविरोधात तक्रार करत फिरत होते. काही देशांनी पाकिस्तानच्या हो ला हो केलं. पण तेच देश आता व्यापार आणि कूटनितीक संबंधांवर चर्चा करण्यासाठी भारतात आले आहेत. भारत आणि मध्य आशियातील पाच देशांमध्ये महत्त्वाची बैठक दिल्लीत होणार आहे. क्षेत्रीय सुरक्षा ते व्यापाराबद्दल चर्चा होईल.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर 6 जून रोजी India-Central Asia Dialogue च्या चौथ्या बैठकीच यजमानपद भूषवतील. या बैठकीसाठी कजाकिस्तान, किर्गिज रिपब्लिक, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उज्बेकिस्तानचे परराष्ट्र मंत्री नवी दिल्लीत पोहोचले आहेत. याआधी तिसरी बैठक भारतातच डिसेंबर 2021 मध्ये दिल्लीत झाली होती.

बैठक का महत्त्वाची ?

भारत आणि मध्य आशियाई देशांचे व्यापारिक संबंध मजबूत करण्याच्या इराद्याने 5 जून रोजी एक बिझनेस काऊन्सिलची बैठकही झाली आहे. MEA ने FICCI सोबत मिळून या बैठकीच आयोजन केलं होतं. यात दोन्ही बाजूंनी व्यापारी करार, गुंवतणूकीची संधी आणि टेक्नोलॉजी ट्रान्सफर या विषयांवर चर्चा केली.

प्रमुख देश आज भारतासोबत

6 जून रोजी होणाऱ्या डायलॉग मीटिंगमध्ये ना फक्त व्यापार आणि संपर्क वाढवण्यावर चर्चा होईल. क्षेत्रीय सुरक्षा, दहशतवाद आणि जागतिक आव्हानं यावर सुद्धा विचार व्यक्त केले जातील. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर ही बैठक अजून महत्त्वाची झाली आहे. भारत आणि मध्य आशिया प्राचीन काळापासून परस्परांचे सांस्कृतीक आणि व्यापारिक भागीदार आहे. हे संबंध पुढे नेण्यासाठी हा संवाद मंच एक संधी देतो. जिथे दोन्ही बाजू मैत्री, विश्वास आणि सहकार्याच्या भावनेने पुढे जातात. पाकिस्तानने अलीकडे भारताविरोधात वातावरण बनवण्याचे भरपूर प्रयत्न केले. पण जगातील प्रमुख देश आज भारतासोबत उभे आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.