
अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला. या टॅरिफमधून भारत मार्ग काढत आहे. इतक्या मोठ्या टॅरिफनंतरही भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. टॅरिफनंतर भारतावर दुसरा मोठा खतरा उभा आहे. चीनला सोडून पाकिस्तान अमेरिका आणि तुर्कीला हाताशी धरून भारताच्या विरोधात मोठा डाव टाकतोय. ज्यामुळे भारताची सुरक्षा, व्यापार याला मोठा फटका बसू शकतो. अरबी समुद्रातील पासनी बंदर अमेरिकेसाठी उघडण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने ठेवला. जे बंदर चीनच्या ग्वादर बंदरापासून फक्त 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे.
पाकिस्तानने अमेरिकेकडे बलूचिस्तानच्या पासनी बंदर 1.2 अरब डॉलर उत्पन्न असलेल्या बंदराला तयार करून वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी हा प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे दिला. यामुळे भारताची डोकेदुखी चांगलीच वाढण्याचे संकेत आहेत. रेअर अर्थ मिनरल्सपर्यंत पोहोचण्यासाठी पाकिस्तानचा हा डाव असल्याचेही बोलले जात आहे.
पाकिस्तान आणि तुर्कीतील संबंध अगोदरपासून चांगले आहेत. दुसरा मोठा निर्णय घेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दाेआन यांना कराची येथील बिझनेस पार्कमध्ये तब्बल 1000 एक्कर जमीन फुकटमध्ये देण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दलची त्यांनी मोठी घोषणा देखील केली. यासोबतच त्यांना काही सुविधा देखील मिळणार आहेत. ही मोठी रणनीती पाकिस्तानची आहे. तुर्कीने भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा थेट विरोध पाकिस्तानसाठी केला. त्यामध्येच पाकिस्तानने ठेवलेले पासनी बंदर हे भारताच्या चाबहार टर्मिनलपासून फक्त 300 किलोमीटर दूर आहे.
जर अमेरिकेने पाकिस्तानचा प्रस्ताव मंजूर केला तर नोड्स-चाबहार (भारत-इराण), ग्वादर (चीन-पाकिस्तान) आणि पासनी (अमेरिका-पाकिस्तान) असे त्रिकोण बनेल, ज्यामध्ये भारत अडकेल. यामुळे अमेरिकेने पाकिस्तानचा प्रस्ताव स्वीकार केला तर तो मोठा धक्का भारतासाठी म्हणाला लागेल. यामुळेच पाकिस्तान मागील काही दिवसांपासून अमेरिकेसोबतची जवळीकता वाढवताना दिसत आहे. यासर्व मुद्द्यामध्ये चीनने फक्त बघ्याची भूमिका घेतलीये. भारताप्रमाणे हा चीनला देखील मोठा धक्का मानला जातोय. चीनचे बंदर पासनी बंदरापासून अत्यंत जवळ आहे.