अमेरिकेच्या भूमीवरून भारताची मोठी चाल, थेट भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देत…

BRICS Foreign Ministers Meeting : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका विविध पद्धतीने भारतावर दबाव टाकण्याचे काम करत आहे. मात्र, आता नुकताच मोठा धक्का डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आलाय. विशेष म्हणजे अमेरिकेच्या भूमीतून हा डाव भारताने टाकला.

अमेरिकेच्या भूमीवरून भारताची मोठी चाल, थेट भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देत...
Donald Trump
| Updated on: Sep 27, 2025 | 1:41 PM

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80 व्या परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अमेरिकेत आहेत. या परिषदेचे आयोजन न्यू यॉर्क शहरात करण्यात आलंय. या परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण होते. मात्र, नरेंद्र मोदी हे अमेरिकेत न जाता फक्त परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गेले आहेत. भारत आणि अमेरिकेमधील सध्याच्या तणावात एस. जयशंकर यांच्या या दाैऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालंय. यावेळी अनेक गोष्टींवर चर्चा होणार आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या भूमीवर जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलाच मोठा धक्का दिल्याचे बघायला मिळतंय. आता त्याचे फोटो देखील पुढे आले आहेत.

संयुक्त राष्ट्राची महासभा सुरू असतानाच अमेरिकेच्या भूमीवर ब्रिक्स बैठकीचे आयोजन भारताच्या बाजूने करण्यात आले. शुक्रवारी जयशंकर यांनी न्यू यॉर्कमध्ये ब्रिक्स सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्री आणि इतर प्रतिनिधी मंडळांसाठी बैठक ठेवली. डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिक्ससाठी अगोदरपासूनच मोठा विरोध बघायला मिळतो. ते ब्रिक्सचा जोरदार विरोध करताना दिसतात आणि भारताने अमेरिकेतच ब्रिक्स देशांची महत्वाची बैठक घेतली हे अत्यंत धक्कादायक नक्कीच आहे.

हेच नाही तर ब्रिक्स देशांची ही मिटिंग काही तास सुरू होती. न्यू यॉर्कमध्ये झालेल्या ब्रिक्स सदस्य देशांच्या बैठकीत महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. जेव्हा ब्रिक्स तर्क आणि रचनात्मक बदलाचा एक शक्तिशाली आवाज म्हणून ठामपणे उभा राहिला आहे. ब्रिक्सना शांतता निर्माण, संवाद, राजनयिकता आणि कायद्याचे राज्य या संदेशाला बळकटी देण्याची आवश्यकता आहे. ब्रिक्स देशांची बैठक चक्क अमेरिकेत झाल्याने एकच खळबळ उडाली.

या बैठकीचे काही खास फोटो आणि कोणत्या मुद्द्यांवर नेमकी चर्चा झाली हे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोशल मीडियावर शेअर केले. भारताने या बैठकीचे प्रतिनिधित्व केले. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारताने अनेक देशांसोबत जवळीकता वाढवल्याचे बघायला मिळतंय. चीन आणि भारतातील अनेक वर्षांचे तणावातील संबंध सुधारताना दिसत आहेत. दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करार देखील झाले आहेत.