जगाची उडाली झोप! डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर हे क्षेत्र, खळबळ उडवणारा अहवाल पुढे…
America Tariff : डोनाल्ड ट्रम्प जवळपास सर्वच वस्तूंवर मोठा टॅरिफ लावताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी फार्मा कंपन्यांवर मोठा टॅरिफ लावला. अमेरिकेत आयात होणाऱ्या फार्मा संबंधित वस्तूंवर 100 टक्के टॅरिफ लावण्यात आला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून त्यांच्या धक्कादायक निर्णयामुळे जोरदार चर्चेत आहेत. त्यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट सुरू आहे. फक्त 50 टक्के टॅरिफच नाही तर त्यांनी भारताला धक्का बसवणारी अनेक हैराण करणारी निर्णय घेतली. H-1B व्हिसावर सर्वाधिक भारतीय नागरिक हे अमेरिकेत नोकऱ्या करतात. आता H-1B व्हिसावर तब्बल 88 लाख रूपये टॅरिफ लावण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाच्या विरोधात अमेरिकन टेक कंपन्या या कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेच्या प्रगतीमध्ये H-1B व्हिसा धारकांचे श्रेय मोठे असल्याचाही अनेकांनी दावा केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी फार्मा वस्तूंवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावला. भारतातील अनेक फार्मा कंपन्यांसाठी अमेरिका ही मोठी बाजारपेठ होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भारतीय फार्मा कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. फार्मा कंपन्यांच्या शेअर्सवपही याचा थेट परिणाम होताना दिसला. औषध कंपन्यांनंतर अजून एका मोठा उद्योगाला धक्का देण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प असल्याचे सांगितले जातंय. नुकताच धक्कादायक असा रिपोर्टपुढे आलाय.
रिपोर्टनुसार, रॉयटर्सच्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, डोनाल्ड ट्रम्प इलेक्ट्रिक वस्तूंवर नवीन टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहेत. आता इलेक्ट्रिक वस्तू या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर आहेत. लॅपटॉप, टूथब्रशपासून ते प्रत्येक इलेक्ट्रिक वस्तूवर टॅरिफ लावण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प आहेत. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या इलेक्ट्रिक वस्तूंवर मोठा टॅरिफ लागू शकतो.
100 टक्के टॅरिफ इलेक्ट्रिक वस्तूंवर लागण्याची शक्यता आहे. भारताच्या औषध निर्माण कंपन्या मोठा धक्का डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला असतानाच अजून एक धक्का बसण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या टॅरिफच्या नीतीला फक्त विदेशातूनच नाही तर अमेरिकेतूनही मोठा विरोध होताना दिसत आहे. भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा परिणाम दोन्ही देशांच्या संबंधांवर थेट झाल्याचे बघायला मिळतंय.
