अमेरिकेच्या या निर्णयाने पाकिस्तानला धडकी भरणार? भारताला दिली अशी शस्त्रे की शेजाऱ्यांना कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागणार
India Pakistan Tension : भारताला या उपकरणांचा वापर सहज करता येणार आहे. त्यासाठी कोणतीही अडचण असणार नाही. या कराराचा मुख्य ठेकेदार वर्जीनियातील हॉकआई ३६० कंपनी आहे. ही कंपनी विश्लेषणात्मक तंत्रज्ञान आणि सागरी देखरेख प्रणालींच्या क्षेत्रात आघाडीची आहे.

India Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतासोबत मोठा लष्करी करार केला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या संरक्षण सुरक्षा सहकार्य एजन्सी (DSCA) ने भारताला १३१ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ११०० कोटी रुपये) किमतीच्या लष्करी हार्डवेअर आणि लॉजिस्टिक्स उपकरणांच्या विक्रीला मान्यता दिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असताना हा निर्णय आला आहे.
अमेरिकेच्या ‘फॉरेन मिलिटरी सेल’ (FMS) योजनेअंतर्गत करण्यात आले आहे. त्यानुसार भारताला ‘सी-व्हिजन सॉफ्टवेअर’, ‘रिमोट सॉफ्टवेअर’, विश्लेषणात्मक समर्थन आणि लॉजिस्टिक्स मिळतील. हा करार भारत-अमेरिका दरम्यान होत असलेल्या इंडो-पॅसिफिक समुद्री क्षेत्राच्या संरक्षण सहकार्याचा भाग आहे. या परिसरात शांतता आणि स्थैय निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांकडून सहकार्य करार झाला आहे. या करारामुळे भारताची समुद्र क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
भारत-अमेरिकेने केलेल्या लष्करी करारामुळे डोनाल्ड ट्रम्पच्या नेतृत्वाखालील सरकार भारताला विश्वासपात्र धोरणात्मक भागीदार म्हणून अधिक मजबूत करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. या करारात मिळणारे उपकरणाबाबत बोलताना अमेरिकेने म्हटले आहे की, भारताला या उपकरणांचा वापर सहज करता येणार आहे. त्यासाठी कोणतीही अडचण असणार नाही. या कराराचा मुख्य ठेकेदार वर्जीनियातील हॉकआई ३६० कंपनी आहे. ही कंपनी विश्लेषणात्मक तंत्रज्ञान आणि सागरी देखरेख प्रणालींच्या क्षेत्रात आघाडीची आहे.
भारत-अमेरिका कराराबाबत भारताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. परंतु हा करार भारताची समुद्र क्षमता वाढण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. हिंद प्रशांत सागरात चीनचे वाढणारे वर्चस्व कमी करण्यासाठी हा करार महत्वाचा आहे. तसेच चीन अन् पाकिस्तानसारख्या देशाकडून असणारा धोका लक्षात घेऊन हे लष्करी साहित्य महत्वाचे ठरणार आहे.
भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरु असलेल्या तणावामुळे पाकिस्तानला चीनकडून मदत होत आहे. चीनने पाकला १०० हून अधिक PL-15 लाँग रेंज एअर-टू-एअर क्षेपणास्त्रे दिली आहेत. ही क्षेपणास्त्रे पाकिस्तानने JF-17 थंडर ब्लॉक-3 सोबत एकत्रित केली आहेत.
