भारताची एक भूमिका अमेरिकेसोबत वाढू शकतो तणाव, धोक्याची घंटा, भारताने थेट म्हटले, आमचे..
भारत आणि अमेरिकेत अनेक वर्षांपासून चांगले संबंध राहिले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. दोन्ही देशातील संबंध तणावात आहेत. त्यामध्येच आता भारताकडून मोठे विधान करण्यात आले.

व्हेनेझुएलामध्ये स्थिती तणावपूर्ण असून लोक दहशतीत आहेत. हेच नाही तर गेल्या दोन दिवसांपासून व्हेनेझुएलाच्या राजधानीतही शांतता आहे. लोक रस्त्यावर येणेही टाळत आहेत. व्हेनेझुएलावर अमेरिकेने मोठा हल्ला केला आणि व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना अटक करत अमेरिकेने नेले. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो अमेरिकेतच आहेत. त्यांना कोर्टापुढेही हजर करण्यात आले. त्यांनी कोर्टात स्पष्ट शब्दात म्हटले की, माझे अपहरण करून मला येथे आणले गेले. जगभरातील देश व्हेनेझुएलामधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. चीन, रशियासारख्या देशांनी थेट अमेरिकेच्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. रशिया आणि युक्रेनला शांतता प्रस्ताव देणारे आणि जगातील मोठी सात युद्ध रोखल्याचा दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना अटक करून अमेरिकेत आणले. शिवाय व्हेनेझुएलाच्या तेलावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
व्हेनेझुएलाबद्दल भारताने पहिल्यांदाच मोठे भाष्य केले. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी याबद्दल भाष्य करताना म्हटले की, अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर आणि राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर व्हेनेझुएलामध्ये निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताची एक सर्वात मोठी चिंता व्हेनेझुएलाच्या लोकांच्या सुरक्षेबाबत आहे. लक्झेंबर्गमधील एका कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांनी हे विधान केले.
हेच नाही तर एस. जयशंकर यांनी व्हेनेझुएलाच्या लोकांच्या भविष्यासाठी तोडगा काढण्याचेही आवाहन केले. व्हेनेझुएलामधील परिस्थितीमध्ये भारताने भाष्य करणे टाळले होते. मात्र, आता तेथील नागरिकांच्या सुरक्षेवर थेट भाष्य केले. त्यांनी पुढे म्हटले की, आम्ही सर्व संबंधित पक्षांना आवाहन करतो की, त्यांनी एकत्र बसून व्हेनेझुएलाच्या लोकांच्या कल्याणासाठी एकत्र येऊन निर्णय घ्यावीत.
व्हेनेझुएलाच्या लोकांबद्दल आम्हाला चिंता आहे. व्हेनेझुएलावर अमेरिकेने जी कारवाई केली, ज्यानंतर जगात एकच खळबळ उडाली. अशाप्रकारे एखाद्या देशावर कारवाई करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट शब्दात काही देशांनी म्हटले. रशियाने तर अमेरिकेचे हे पाऊस म्हणजे महायुद्धाचे असल्याचे म्हटले. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी अजूनही काही देशांना थेट धमकी दिली आहे.
