डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने जगात खळबळ, अखेर हा देश आला शरण, तब्बल 5 कोटी बॅरल करणार सुपूर्द..
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर व्हेनेझुएलावर मोठा हल्ला करण्यात आला. सध्या अमेरिकेचे नियंत्रण व्हेनेझुएलावर आहे. यादरम्यान आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाची झोप उडवणारी घोषणा केली आहे.

व्हेनेझुएलावर मोठा हल्ला अमेरिकेने केला. फक्त हल्लाच नाही तर अमेरिकेने थेट व्हेनेझुएलावर हल्ला करत व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांना अटक केली आणि पत्नीसह त्यांना अमेरिकेत आणले. मादुरो अमेरिकेत असून अमेरिकेच्या एका तुरूगांत त्यांना ठेवले. अमेरिकेने ज्याप्रकारे एका देशाच्या अध्यक्षाला अटक केले, त्यानंतर मोठी खळबळ उडाली. आता यादरम्यानच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, व्हेनेझुएलाने अमेरिकेला 30 ते 50 दशलक्ष बॅरल तेल विकण्यास सहमती दर्शवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर हल्ल्यानंतर हाच आरोप केला जात होता, अंमली पदार्थांची तस्करी हे फक्त कारण आहे. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये व्हेनेझुएलाच्या तेलावर नियंत्रण हवे आहे. त्यामध्ये ते दबाव टाकत होते.
शेवटी अमेरिकेने आता व्हेनेझुएलच्या तेलावर नियंत्रण मिळवले आहे. मादुरो यांना कोर्टात हजर केले असताना त्यांनी स्पष्ट म्हटले की, मी एका देशाचा अध्यक्ष असून माझे अपहरण करून मला येथे आणले गेले, मी काही गुन्हेगार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांना या योजनेवर काम करण्यास सांगितले आहे. तेल साठवणूक जहाजांच्या मदतीने अमेरिकेत आणले जाईल आणि आम्ही त्याची साठवणूक करू.
पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले की, राष्ट्राध्यक्ष म्हणून या तेलावर माझे नियंत्रण असेल, पण त्याचा वापर व्हेनेझुएला आणि अमेरिकेच्या लोकांच्या फायद्यासाठी केला जाईल… अखेर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनातील कपट पुढे आले असून त्यांनी इतका मोठा कट फक्त आणि फक्त व्हेनेझुएलच्या तेलासाठी रचल्याचे स्पष्ट झाले. मादुरोला अटक करून त्यांनी त्यांच्या देशातील तेलावर नियंत्रण मिळवणे आहे.
हेच नाही तर अमेरिका लवकरच व्हेनेझुएलाच्या तेल कंपन्यांच्या मालकांसोबत एक बैठक घेणार आहे. लवकरच त्याची वेळ आणि तारीख ठरवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करून थेट आता त्यांच्या तेलावर नियंत्रण मिळवले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती आता व्हेनेझुएलचा कारभार आहे. यासोबतच अजून दोन देशांना थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिलीये.
