डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, थेट म्हणाले मोदी, हे माझ्यावर…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत धक्कादायक विधाने करताना दिसत आहेत. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठे विधान केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. हा टॅरिफ लावताना भारता हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण टॅरिफ लावत असल्याचे त्यांनी म्हटले. भारतातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निर्यात होते. मात्र, टॅरिफ लावल्यानंतर थेट त्याचा परिणाम होणाऱ्या निर्यातीवर दिसला. इतका मोठा टॅरिफ भरून अमेरिकेत उत्पादन पाठवणे शक्य नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. भारताकडून टॅरिफ कमी करण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. हेच नाही तर अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर आपण किती पैसा कमावला. थेट याचाच आकडा डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला. अनेक वर्ष भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले राहिले आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशातील संबंध तणावात असल्याचे बघायला मिळतंय. व्यापार चर्चा सुरू आहेत, मात्र निर्णय काहीच नाही.
आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या संबंधांवर भाष्य केले. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध आहेत. मात्र, रशियाच्या तेलामुळे आम्ही जो टॅरिफ लावला, त्यामुळे नरेंद्र मोदी नक्कीच आनंदी नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, माझे आणि नरेंद्र मोदींचे चांगले संबंध नक्कीच आहेत.
पण सध्या ते माझ्यावर खुश नाहीत. कारण त्यांना मोठ्या प्रमाणात टॅरिफ हा भरावा लागत आहे. हा पण एक गोष्ट आहे की, भारताने रशियाकडून तेलाची निर्यात खूप जास्त कमी केली. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. भारत आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या संबंधांवर थेटपणे बोलताना डोनाल्ड ट्रम्प हे दिसले आहेत.
भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण भारतावर अतिरिक्त टॅरिफ आकारत असल्याने अमेरिकेने म्हटले. भारतावर अमेरिकेचा एकप्रकारे मोठा दबाव होता. यादरम्यान रशियाचे अध्यक्ष पुतिन हे भारत दाैऱ्यावर आले आणि त्यांनी भारतासोबत काही महत्वाचे करार करत जगाला भारत आणि रशियाची मैत्री दाखवली. भारत हा टॅरिफ कमी करण्यासाठी आग्रही असल्याने व्यापार करार पुढे जात नसल्याचे सांगितले जात आहे.
