जगातील एकाही देशाला जे जमले नाही ते भारताने करून दाखवले, थेट शोधले ऊर्जेचे ब्रह्मास्त्र, LPG चे नो टेन्शन…
इराण आणि अमेरिका युद्धात भारतासाठी आनंदाची बातमी आहे. जग ऊर्जेच्या संकटात असताना भारताने एक मोठी गोष्ट साध्य करून दाखवली. ज्याची आकडेवारी पुढे आली. भारताने एकप्रकारचा अत्यंत मोठा इतिहास लिहिला आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक ऊर्जेचे संकट वाढत आहे. अनेक देशांमध्ये ऊर्जा नसल्याने संकट आहे. मात्र, याला भारत अपवाद ठरला आहे. भारत गेल्या काही वर्षांपासून मिशन मोडमध्ये नवीकरणीय ऊर्जेवर काम करत आहे. त्याचेच हे परिणाम आहेत, की जग ऊर्जेचा संकटात असताना भारताला याचा काहीही फटका बसत नाहीये. सौर ऊर्जेद्वारे विक्रमी ऊर्जा उत्पादन साध्य झाले. भारताने सौर ऊर्जेद्वारे 45 गिगावॅट वीज निर्माण केली. भारताने पवन ऊर्जा क्षेत्रातही प्रचंड यश मिळवले आहे. भारताने पुन्हा एकदा जगाला दाखवले की, आपली ताकद नक्की काय आहे. मागील काही वर्षांचा विचार करता भारताने ऊर्जा क्षेत्रात मोठे काम केले आणि त्यात यशही मोठे मिळाले. एलपीजीचे टेन्शन जगात असताना आता भारताच्या प्रत्येक घरात चूल पेटत राहील. भारताने 2025-26 दरम्यान पवन ऊर्जा क्षमतेत विक्रमी 6.1 गिगावॅट (GW) ची वाढ नोंदवून स्वच्छ ऊर्जेमध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, ही आतापर्यंतची सर्वात मोठी वार्षिक वाढ आहे. देशाच्या ऊर्जा सुरक्षेच्या आणि हरित ऊर्जेच्या भविष्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारताला कोणावही अवलंबून राहण्याची अजिबात गरज नाही. उलट भारत या युद्धाच्या परिस्थितीमध्ये बांगलादेशची मदत करत आहे.
जगातील जे कोणत्याही देशाला जमले नाही ते भारताने नक्कीच करून दाखवले आहे. या क्षेत्रातील प्रचंड क्षमतेवर भर देताना 150 मीटर उंचीच्या हबवर भारताची पवन ऊर्जा क्षमता अंदाजे 1,164 गिगावॅट आहे, जी देशाला ऊर्जा उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यात मोठी भूमिका बजावते. जर प्रयत्नांची सध्याची गती कायम राहिली तर भारत 2030 पर्यंत 100 गिगावॅट आणि 2036 पर्यंत 156 गिगावॅट पवन ऊर्जा क्षमता गाठू शकतो.
हा सध्याच्या घडीला भारताचा अत्यंत मोठा विजय म्हणावा लागेल. इराण आणि अमेरिका युद्धात एक गोष्ट स्पष्ट झाले की, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही इतरांवर अवलंबून राहू शकत नाही. या युद्धात अचानक होर्मुज खाडी बंद करण्यात आली. ही होर्मुज खाडी बंद असल्याने जगात ऊर्जेचे एक वेगळे संकट निर्माण झाले.