
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकिस्तानमधील तणाव अधिक वाढला. पाकिस्तान असा देश आहे, ज्यावर भारत कधीच विश्वास ठेऊ शकत नाही. पाकिस्तान कधी दगा फटका करेल याचा नेम नाही. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर मोठा तणाव आहे. पाकिस्तान सैन्याकडून अनेक हल्ले अफगाणिस्तानवर केली जात आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने अनेक देशांची पाय पकडत थेट संरक्षण करार केली. आता पाकिस्तानची झोप उडाली. भारताने आज अरबी समुद्रावर फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) सोबत एक मोठा हवाई लढाऊ सराव सुरू केला आहे. ज्याचा उद्देश त्रिपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करणे आहे. हिंद महासागर प्रदेश आणि व्यापक इंडो-पॅसिफिकमध्ये लष्करी समन्वय वाढवणे आहे.
या हवाई सरावासाठी भारतीय हवाई दल (IAF) त्यांचे सुखोई-30 MKI आणि जग्वार लढाऊ विमाने, IL-78 एअर-टँकर आणि AEW&C विमानांसह तैनात आहेत. ही सर्व विमाने गुजरातच्या जामनगर आणि नलिया एअरबेसवरून उड्ढाण घेतील. पाकिस्तानच्या अगदी जवळ हा युद्ध अभ्यास सुरू आहे. अल-धाफ्रा हवाई तळावरील राफेल आणि मिराज लढाऊ विमाने, फ्रान्स आणि युएईमधील इतर सहाय्यक विमानांसह सहभागी होतील.
भारताने 10 आणि 11 डिसेंबर रोजी कराची, पाकिस्तानपासून सुमारे 200 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या सरावासाठी नियुक्त केलेल्या क्षेत्रासाठी एक नोटम जारी केला आहे. यापूर्वी देखील तिन्ही देशांनी डिसेंबर 2024 मध्ये असा हवाई लढाऊ सराव आयोजित केला होता. मात्र, हा पाकिस्तानसाठी अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल. कारण पाकिस्तानच्या अगदी जवळ भारताचे शक्तीशाली लढाऊ विमाने जात आहेत.
या सरावात तीव्र लढाऊ कौशल्ये, युद्धाभ्यासांचे प्रदर्शन केले जाईल. फ्रान्स आणि युएईमधील राफेल आणि मिराज लढाऊ विमाने आणि इतर विमानांसह, अल धाफ्रा हवाई तळावरून येणार आहेत. दोन दिवस हा युद्धाअभ्यास सुरू असेल. भारत आपली ताकद या माध्यमातून जगापुढे दाखवेल. या हवाई सरावा अभ्यासाकडे पाकिस्तानचे बारीक लक्ष असणार आहे. पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारताकडून हा सराव अभ्यास केला जात आहे.