पीएम मोदींमुळे भारत जगात शक्तीशाली; त्रिनिदाद आणि टोबॅकोच्या पंतप्रधानांनी उधळली स्तुतीसुमनं
PM Kamala Persad Bissessar praise PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या त्रिनिनाद आणि टोबॅगो या देशाच्या दौऱ्यावर आहेत. या देशात मूळ भारतीय लोकांची संख्या मोठी आहे. येथील पंतप्रधान सुद्धा भारतीय वंशाच्या आहेत. त्या मुळच्या बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशात ऐतिहासिक स्वागत झाले. या ठिकाणी त्यांना द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगो हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला. यावेळी देशाच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. त्यांनी मोदींचे जमके कौतुक केले. मोदी हे जगातील सन्मानिय, प्रशंसनीय आणि दूरदर्शी नेते असल्याचे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातिक मंचावर भारताला शक्तीशाली देश केल्याचे कमला प्रसाद-बिसेसर म्हणाल्या.
तुमचे स्वागत, ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमच्यासाठी प्रिय नेते आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांचे स्वागत आहे. त्यांचे आगमन हे केवळ आमच्या शिष्टाचाराचा भाग नाही. ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. ते जगातील सर्वात दूरदर्शी नेते आहेत असे कौतुक कमला प्रसाद बिसेसर यांनी केले. त्यांनी भारताला जागतिक मंचावर एक शक्तीशाली देश म्हणून समोर आणल्याचे त्या म्हणाल्या.
जगभरातील भारतीयांना त्यांचा अभिमान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला आधुनिक केले. एक अब्जापेक्षा अधिक लोकांचा हा देश सशक्त आणि प्रगती साधत आहे. याचा जगभरातील भारतीयांना सार्थ अभिमान असल्याचे गौरद्वागार कमला प्रसाद-बिसेसर यांनी काढले. त्यांच्या भाषणात त्यांनी मोदींचे तोंडभरून कौतुक केले. द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगो हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करण्यात आला.
कोविडमधील मदतीबद्दल भारताचे मानले आभार
पंतप्रधान बिसेसर यांनी चार वर्षांपूर्वी कोविड-19 महामारीच्या काळाची आठवण करत भारताचे आभार मानले. त्यावेळी जग अनिश्चिततेच्या गर्तेत होते. आमच्या सारख्या छोट्या देशाची तर गोष्टच वेगळी होती. पण मोदी सरकारने त्यावेळी कोविड लस आम्हाला पाठवली. ही केवळ कुटनीती नव्हती. तर आमच्याविषयीचा त्यांचा बंधुभाव, प्रेम आणि मानवता दिसून आली. कमला प्रसाद-बिसेसर यांचे पूर्वज हे बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील आहेत.
