AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांसाठी तातडीचा अलर्ट, पुढच्या 48 तासांसाठी… वाचा नेमकं काय सांगितलं?

Iran vs USA : इराणमधील झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या दूतावासाने तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अधि सूचना जारी केली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांसाठी तातडीचा अलर्ट, पुढच्या 48 तासांसाठी... वाचा नेमकं काय सांगितलं?
iran war indiaImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 07, 2026 | 9:33 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध आता भयंकर स्थितीत पोहोचले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची सभ्यता नष्ट करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता हालचालींना वेग आला आहे. इराणमधील झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या दूतावासाने तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अधि सूचना जारी केली आहे. यात सध्या इराणमध्ये असलेल्या भारतीयांनी जिथे आहेत तिथेच राहावे. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि कुठेही जाणे-येणे टाळावे. पुढील 48 तास घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच बाहेर पडण्यापूर्वी भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर भारतीय नागरिकांसाठी अधिसूचना

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 24 तासांमध्ये होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्याचा आणि करार स्वीकारण्याचा इशारा दिला होता. मात्र आता दिलेल्या मुदतीपूर्वीच अमेरिकेने इराणवर हल्ले सुरू केले. अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील खर्ग आयलंड आणि रेल्वे नेटवर्कवर भीषण हल्ले केले आहेत. या हल्ल्यांनंतर इराणमधील अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. या हल्ल्यानंतर ट्रंप यांनी, ‘आज रात्री एक संपूर्ण सभ्यता नष्ट होईल. मला असे व्हावे असे वाटत नाही, पण तसे होईल.’ असा इशारा दिला आहे. त्यानंतर आता भारताने आपल्या नागरिकांसाठी सूचना जारी केली आहे.

ट्रम्प यांची ट्रूथ सोशलवर पोस्ट

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर पोस्ट करत लिहिले की, ‘एक संपूर्ण सभ्यता आज रात्री नष्ट होईल, जी पुन्हा कधीही परत आणता येणार नाही. मला असे व्हावे असे वाटत नाही, पण कदाचित तसे होईल. आज रात्री आपल्याला कळेल, जे जगाच्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक असेल.’

इराण आर्थिक दहशतवाद पसरवत आहे – जेडी वेंस

ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले की, ‘आज रात्री आर्थिक दहशतवादाचा अंत करू.’ पुढे बोलताना त्यांनी इराण आर्थिक दहशतवाद पसरवत आहे असा आरोपही केला आहे. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणनेही प्रत्युत्तरात्मक कारवाई केली. इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या तेल आणि वायू क्षेत्रांवर हल्ले केले, तसेच अमेरिकेच्या सहयोगी देशांच्या तेल-गॅस प्रकल्पांनाही लक्ष्य केले. याशिवाय, इराणने इस्रायली लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. त्यामुळे आता या युद्धाला एक नवे वळण मिळाले आहे.

Follow Us
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....