AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनचा काटा काढण्यासाठी भारताची मोठी खेळी, ‘या’ देशासोबत केली हातमिळवणी

चीनने भारताला दणका देत रेअर अर्थ मटेरियलचा पुरवठा कमी केला आहे, त्यामुळे भारतातील ऑटो आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग धोक्यात आला आहे.

चीनचा काटा काढण्यासाठी भारताची मोठी खेळी, 'या' देशासोबत केली हातमिळवणी
india and china
| Updated on: Jun 30, 2025 | 9:12 PM
Share

चीनने भारताला दणका देत रेअर अर्थ मटेरियलचा पुरवठा कमी केला आहे, त्यामुळे भारतातील ऑटो आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग धोक्यात आला आहे. स्मार्टफोन, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये या मटेरियलचा वापर केला जातो. आता हे मटेरियलचा तुडवडा निर्णाण झाल्यास उत्पादन ठप्प होण्याचा धोका आहे. मात्र आता भारताने यावर मार्ग काढला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

चीनच्या निर्णयानंतर आता भारताने यावर मार्ग शोधत जपानसोबत हातमिळवणी केली आहे. अनेक जपानी कंपन्या रेअर अर्थ मटेरियल आणि बॅटरीचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. रिलायन्स आणि अमारा राजा या कंपन्याही यात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या वृत्तानुसार, डझनभराहून अधिक जपानी कंपन्या दिल्लीत पोहोचल्या आहेत, यात मित्सुबिशी केमिकल्स, सुमिमोटो मेटल्स अँड मायनिंग आणि पॅनासोनिक या बड्या कंपन्यांचा समोवेश आहे. या कंपन्या जपानच्या औद्योगिक संस्था ‘बॅटरी असोसिएशन ऑफ सप्लाय चेन’ (BASC) चा भाग आहेत. आता भारतीय कंपन्यांसोबत पार्टनरशीप करुन रेअर अर्थ मटेरियल आणि इलेक्ट्रिक वाहन बॅटरीची पुरवठा चेन मजबूत करण्याच्या तयारीत आहेत. या कंपन्यांसोबत करार झाल्यास चीनवर अवलंबून असलेल्या भारताला दिलासा मिळणार आहे.

भारतीय कंपन्या करार करणार

रिलायन्स आणि अमारा राजा या भारतीय कंपन्या जपानी कंपन्यांशी कराराबाबत चर्चा करत आहेत. लिथियम-आयन बॅटरी, लिथियम आणि ग्रेफाइट या खनिजांच्या व्यापाराबाबत ही चर्चा सुरु आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी या बॅटरी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मुकेश अंबानींची कंपनी करार करण्यासाठी आघाडीवर आहे.

चीनचे वर्चस्व

रेअर अर्थ मटेरियलवर चीनची मक्तेदारी आहे, ती संपवणे सोपे काम नाही. जागतिक लिथियम बॅटरी उत्पादनात चीनचा वाटा 80 टक्के आहे, तर जपानचा वाटा 10 टक्के आहे. सध्या भारतातील ईव्ही कंपन्या चीनमधून बॅटरी आयात करतात. तसेच काही कंपन्या दक्षिण कोरिया आणि जपानमधून आयात करतात. चीनची मक्तेदारी यामुळे आहे की, चीनकडे मोठ्या प्रमाणात कच्चा माल आहे. त्यामुळे चीनची मक्तेदारी तोडणे अवघड आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.