AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-maldive Row : भारत-मालदीव संबंध बिघडल्याने चीनकडून आगीत तेल टाकण्याचं काम

India maldive row : भारत आणि मालदीव यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. पण याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न चीनकडून होत आहे. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने आगीत तेल टाकण्याचे काम सुरु केले आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका देखील केली आहे.

India-maldive Row : भारत-मालदीव संबंध बिघडल्याने चीनकडून आगीत तेल टाकण्याचं काम
shailesh musale
shailesh musale | Updated on: Feb 07, 2024 | 5:14 PM
Share

India maldive Row : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सध्या ताणले गेले आहेत. दोन्ही शेजारील देशामध्ये तणाव कायम आहे. मालदीवमध्ये चीन समर्थक सरकार आल्याने संबंध संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. चीन याचा पुरेपूर फायदा घेण्याच्या तयारीत आहे. तो मालदीवशी जवळीक वाढवत आहे.

भारत आणि मालदीव यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीवर चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने आता विष पसरवरणारी बातमी दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, भारत-मालदीवमधील संघर्ष प्रथम शेजारच्या बांधिलकीची चाचणी घेतो’. या लेखात हत्तीचा चेहरा असलेला माणूस दाखवला आहे. ज्याच्या हातात काटेरी छडी दिसतेय.

भारतावर टीका

मालदीवशी भारताचे संबंध किती अस्वस्थ आहे हे या लेखात लिहिले आहे. ग्लोबल टाइम्सच्या मते, दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये भारताविरोधात नकारात्मकता वाढत आहे. मोदी सरकारने आता आपल्या पारंपरिक बिग ब्रदरचा विचार सोडून योग्य तोडगा काढावा.

लेखात असे लिहिले आहे की, आपली भक्कम स्थिती आणि नेबर फर्स्ट धोरण अवलंबत असले तरी देखील शेजारील देशांची मने जिंकण्यात अपयशी ठरत आहे. दोन शेजारी देशांमधील वादाचे कारण म्हणजे मालदीवमध्ये तैनात असलेले भारतीय सैनिक.

लेखात पुढे म्हटले आहे की मालदीवच्या नवीन सरकारने भारतीय सैनिकांना 10 मे पर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत, परंतु भारत सरकारने अद्याप कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. अशा स्थितीत हे मुत्सद्दी नाटक पुढे जाणे अपेक्षित आहे.

भारतावर आरोप

ग्लोबल टाइम्सने भारताकडून मालदीववर सतत दबाव आणल्याचा आरोप केला आहे. भारतीय तटरक्षक दल मालदीवच्या बोटींना रोखत आहे. पुढील 2 ते 3 महिन्यात काहीही होऊ शकते. मोदी सरकारने मालदीवच्या विकास मदतीतही कपात केली आहे, यावरून सध्याच्या सरकारच्या विरोधातील उदासीनता दिसून येते.

भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध तणावपूर्ण असल्याने चीन देखील त्यात आणखी मीठ टाकण्याचं काम करत आहेत. चीनकडून पाठिंबा मिळत असल्याने मालदीवरचे राष्ट्राध्यक्ष देखील भारतविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत.

Follow Us
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...