
Cyclone Ditwah Update : सध्या श्रीलंका देशावर दितवाह चक्रीवादळाचं मोठं संकट उभं राहिलं आहे. या चक्रीवादळामुळे येथे आतपर्यंत 123 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या वादमुळामुळे सध्या समुद्र खवळलेला असून अनेक ठिकाणी अतिवृषटी, भुस्खल, मुसळधार पाऊस यासारख्या घटनांनी श्रीलंकेत मोठं नुकसान झालं आहे. या वादळामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे श्रीलंकेत 123 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 130 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. असे असतानाच आता श्रीलंकेनंतर हेच संकट भारतावरही येण्याची शक्यता आहे. भारताने नागरिकांना मोठा आणि महत्त्वाचा इशारा दिला आहे.
श्रीलंकेत आलेल्या दितवाह या चक्रीवादळामुळे साधारण 2 लाख लोक प्रभावित झालेले आहेत. संपूर्ण श्रीलंकेत सगळीकडे पूरस्थिती आलेली आहे. त्यामुळे शोकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या पूरस्थितीचा परिणाम कोलंबो आणि पूर्व तटावर जास्त परिणाम जाणवत आहे. केलानी नदी सध्या उधाणलेली आहे. श्रीलंकेच्या उत्तरी भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी वीज खंडित झालेली आहे. तर काही ठिकाणी रस्ते वाहतूक आणि रेल्वे सेवा ठप्प आहे. शाळा आणि कार्यलये बंद ठेवण्यात आली आहेत.
श्रीलंकेत दितवाह नावाचं चक्रीवादळ 24 नोव्हेंबर रोज श्रीलंकेच्या आसपास सक्रीय झालं होतं. हे वादळ नंतर हळूहळू उत्तर-पश्चिम दिशेने जायला लागलं. 26 नोव्हेंबर रोजी पूर्व किनाऱ्यावर हे वादळ धडकले. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेत 50 ते 70 किमी प्रतितास या वेगाने वेगवान हवा सुटली आणि मुसळधार पाऊस पडायला लागला. या पावसामुळे काही ठिकाणी भूस्खलन आणि पूर आला. परिणामी आतार्यंत दितवाह वादळामुळे एकूम 123 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत.
श्रीलंकेतील दितवाह या चक्रीवादळाचा भारताला काही प्रमाणात धोका असू शकतो. हीच बाब लक्षात घेऊन बचाव यंत्रणांना सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. दितवाह हे चक्रीवादळ आता उत्तर पश्चिमेच्या दिशेने पुढे सरकत आहे. 30 नोव्हेंबर रोजी हे चक्रीवादळ तामिळनाडू आणि पुदुच्चेरीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी त्या राज्यातील 14 जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा आदेस दिला आहे. सोबतच एनडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. पुद्दुचेरीमध्ये 16 एसडीआरएफ आणि 12 एनडीआरएफच्या तुकड्या अलर्ट मोडवर आहेत. मच्छीमारांना मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याची सूचना करण्यात आली आहे.