ही तर सर्कस… पाकिस्तानी सैन्याच्या दाव्यांची लोकांनी उडवली खिल्ली, आंतरराष्ट्रीय मीडिया काय म्हणाला?

भारत-पाकिस्तान संघर्षानंतर पाकिस्तानाने घेतलेल्या पत्रकार परिषदेची जगभर खिल्ली उडवली जात आहे. भारताने पुराव्यांसह आपले दावे सिद्ध केले, तर पाकिस्तानाने कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. पाकिस्तानाच्या मोठ्या दाव्यांना सोशल मीडियावरूनही जोरदार विरोध झाला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमही पाकिस्तानाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

ही तर सर्कस... पाकिस्तानी सैन्याच्या दाव्यांची लोकांनी उडवली खिल्ली, आंतरराष्ट्रीय मीडिया काय म्हणाला?
India- Pakistan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 12, 2025 | 5:18 PM

भारत-पाकिस्तान दरम्यान आठवड्याभरापूर्वी जोरदार हल्ला झाला. मिसाईल, ड्रोन हल्ले झाले. गोळीबार करण्यात आला. त्यानंतर युद्धविरामही झाला. या काळात दोन्ही देशांनी एकमेकांचं नुकसान केलं. पण सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानने पत्रकार परिषद घेऊन जी माहिती दिली. त्याची आता जगभरात खिल्ली उडवली जात आहे. भारताने 100 अतिरेकी मारल्याची, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचे, पाकिस्तानी सैन्याचा एअरबेस नेस्तनाबूत केल्याचा आणि सुमारे 40 पाकिस्तानी जवान मारल्याचा दावा केला होता. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने इतके काही हवेतील बाण सोडले की लोक म्हणाले, ही सर्कस थांबवाच.

भारतीय सैन्याच्या प्रेस कॉन्फरन्सनंतर काही सोशल मीडियातील यूजर्सनी भारतीय सैन्याची प्रेस कॉन्फरन्स आम्हाला पटली असं मह्टलंय. शिव तांडव स्त्रोताने सुरू करण्यात आलेली पत्रकार परिषदेची सुरुवात हा एक महत्त्वाचा संदेश आहे, असं अनुष्का सोहम बथवाल नावाच्या एका सोशल मीडिया यूजरने म्हटलं आहे. तर पाकिस्तानी सैन्याची प्रेस कॉन्फरन्सही भारतीय सैन्याच्या पत्रकार परिषदेची कॉपी असल्याचंही म्हटलं आहे. पाकिस्तानी सैन्याच्या पत्रकार परिषदेत मोठमोठे दावे करण्यात आले. पण काडीचाही पुरावा दिला नाही. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्याच्या तळांवर हल्ले केल्याचं म्हटलं. पण पुरावे दिले नाही. पण भारतीय सैन्याने मात्र पुरावे देऊन पाकिस्तान कसा खोटं बोलत आहे हे दाखवून दिलं आहे.

लोक म्हणाले, सर्कस…

पाकिस्तानी सैन्याने सिरसाहून दिल्लीपर्यंत निशाणा साधण्यात आल्याचं म्हटलं होतं. लोकांनी त्यावरून पाकिस्तानची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी सैन्याने भारताची कॉपी करून पत्रकार परिषदा घेतल्या. मोठे दावेही दिले. पण पाकिस्तानी सैन्याकडे व्हिडीओ नव्हते, कोणतेही फुटेज नव्हते आणि साधे फोटोही नव्हते. आपले दावे खरे असल्याचं सिद्ध करण्यासाठीचा एकही पुरावा पाकिस्तानी सैन्याकडे नव्हता, असं लोक म्हणाले. काही लोकांनी तर पाकिस्तानी सैन्याची पत्रकार परिषद ही सर्कस होती असं म्हटलंय. मेरू नावाच्या सोशल मीडिया यूजरने तर पाकिस्तानी सैन्य सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि क्लिप्सचा वापर पुरावे म्हणून देत आहे. खरं तर हा प्रकारच हस्यास्पद असल्याचं म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय मीडियाचे सवाल

भारतीय सैन्याने जेएफ16 ला जे नुकसान पोहोचवलं त्याचे पुरावे दिले. पाकिस्तानी लोक आपल्या सैन्याच्या पत्रकार परिषदा का व्हायरल करत नाहीत? असा सवालही लोक विचारत आहेत. पाकिस्तानी सैन्य हे शाळेतल्या मुलांसारखं खोटं बोलत आहेत. हे पाकिस्तानी नागरिकांनाही माहीत आहे, असंही लोकांनी म्हटलं आहे. स्काई न्यूज आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनीही पाकिस्तानी सैन्यावर सवाल करणारे रिपोर्ट्स तयार केले आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आज डीजीएमओ स्तरावर चर्चा होणार आहे. या चर्चेत संघर्षविरामानंतरच्या स्थितीवर चर्चा होईल.