AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने जगाला दाखवली ताकद, अमेरिकेला ठेंगा, रशियाने दिली साथ, थेट 6.7 अरब डॉलर..

इराण आणि अमेरिका युद्धात रशियाचा मोठा फायदा झाला. अमेरिकेने जगातील तेलाचा तुटवडा भरून काढण्याकरिता थेट रशियाच्या तेलावरील निर्बंध काही काळाकरिता उठवली. यादरम्यानच आता अमेरिकेला मुंग्या लागणारी आकडेवारी पुढे आली.

भारताने जगाला दाखवली ताकद, अमेरिकेला ठेंगा, रशियाने दिली साथ, थेट 6.7 अरब डॉलर..
Vladimir Putin and Narendra Modi
| Updated on: Jun 14, 2026 | 9:59 AM
Share

भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करू नये, याकरिता भारतावर मोठा दबाव गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेचा आहे. याकरिता भारतावर मोठा टॅरिफही लावला. मात्र, अमेरिकेला भारताने थेट मोठा दणका देत रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. या युद्धाच्या परिस्थितीमध्येही भारत रशियाकडूनच तेल खरेदी करत आहे. इच्छा असतानाही भारताला अमेरिका रोखू शकत नाही. इराण आणि अमेरिका युद्धात अमेरिकेचे तीन तेरा वाजले आहेत. 2026 मध्ये रशियाडून इंधन खरेदी करणारा भारत हा जगात दुसऱ्या नंबरचा देश ठरला आहे. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) च्या अहवालानुसार, मे महिन्यात भारताने रशियाकडून सुमारे 5.8 अब्ज युरो मूल्याच्या हायड्रोकार्बन्सची आयात केली. रिपोर्टनुसार, रशियातून भारताने केलेल्या एकून आयातीमध्ये कच्च्या तेलाचा वाटा 83 टक्के होता. याव्यतिरिक्त, तेल उत्पादनांची आयात 550 दशलक्ष युरो, तर कोळशाची आयात 429 दशलक्ष युरो इतकी होती.

अमेरिकेने प्रत्येक प्रयत्न भारत आणि रशिया रोखण्यासाठी गेले. कधी भारताला रशियाचे कपडे धुण्याचे मशिन म्हटले तर कधी भारताला धमक्या दिल्या. त्यावरही भारत आणि रशियाच्या मैत्रीत फुट पाडण्यात यश मिळाले नाही तर थेट 200 टक्के भारतावर टॅरिफ लावला. त्याला कारण सांगितले की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आम्ही टॅरिफ लावत आहोत.

भारतापेक्षाही चीन हा रशियाकडून तेल खरेदी करणारा मोठा देश आहे. जगात रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करणारा 1 नंबरचा देश चीन आहे. मात्र, त्या चीनवर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ अमेरिकेने लावला नाही. तिथेच अमेरिकेची दुटप्पी भूमिका जगाने बघितली. भारतावर अमेरिका विविध निर्बंध घालत असताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन थेट भारताच्या दाैऱ्यावर आले.

फक्त भारताच्या दाैऱ्यावरच नाही तर त्यांच्यासोबत त्यांनी काही मंत्रीही आणले. यादरम्यान अनेक मोठे करार रशियाने भारतासोबत केले. यावेळीच जगाने भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री नक्की काय आहे हे बघितले. यादरम्यान अमेरिकेने मुद्द्यात पाकिस्तानला हाताशी धरले. ऑपरेशन सिंदूरनंतरही अमेरिकेच्या अध्यक्षांनी काही धक्कादायक दावे केले.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं