AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, थेट हातावर तुरी, पाकड्यांची उडाची झोप, अँटी टँक क्षेपणास्त्रांसोबत…

भारत अमेरिकेतील संबंध टॅरिफच्या मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून तणावात बघायला मिळाली. मात्र, आता दोन्ही देशांमध्ये अत्यंत मोठा करार झाला. हा भारताचा पाकिस्तानला अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल.

भारताचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, थेट हातावर तुरी, पाकड्यांची उडाची झोप, अँटी टँक क्षेपणास्त्रांसोबत...
100 FGM 148 Javelin missiles
| Updated on: Nov 20, 2025 | 9:53 AM
Share

मागील काही दिवसांपासून भारत अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. अमेरिकेने रशियाला रोखण्यासाठी चक्क भारतावर मोठा टॅरिफ लावला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला. त्यामध्येच पाकिस्तान सतत भारत आणि अमेरिकेतील संबंध खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. हेच नाही तर ऑपरेशन सिंदूरनंतर भारताविरोधात मुस्लिम देशांना भडकवण्याचे काम पाक करतोय. टॅरिफच्या मुद्द्यानंतर तणाव असतानाही भारत अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू असून अंतिम टप्प्यात व्यापार करार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले. त्यामध्येच आता भारताने फक्त पाकिस्तानच नाही तर संपूर्ण जगाला मोठा धक्का देत अमेरिकेने भारतासाठी 93 दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी पॅकेजला मंजुरी दिली आहे.

ज्यामुळे भारताला जेव्हलिन अँटी-टँक क्षेपणास्त्रे आणि एक्सकॅलिबर प्रिसिजन-गाइडेड तोफखाना राउंड्सची नवीन  खरेदी करण्याची परवानगी मिळाली आहे. हे भारताचे मोठे यश असल्याचे बोलले जातंय. भारताला 100 FGM- 148 जेव्हलिन क्षेपणास्त्रे, 25 लाईट कमांड लाँच युनिट्स आणि 216 एक्सकॅलिबर तोफखाना राउंड मिळतील. यामुळे भारताची मोठी ताकद वाढणार हे स्पष्ट आहे.

ऑपरेशन सिंदूरदरम्यानच भारताने पाकिस्तानला सळो की पळो कडून सोडले होते. त्यामध्येच भारताची अजून ताकद वाढलीये. डीएससीएने म्हटले आहे की हे संरक्षण पॅकेज अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करेल आणि पुढील धोक्यांना तोंड देण्याची भारताची क्षमता वाढवेल. हा खरोखरच अत्यंत मोठा करार दोन देशांमध्ये झाल्याचे बघायला मिळतंय.

काही दिवसांपूर्वी भारताने रशियासोबत देखील संरक्षण करार केला. अमेरिकेने सुमारे $47 दशलक्ष किमतीच्या एक्सकॅलिबर गाईडेड तोफखाना राउंड्सच्या विक्रीलाही मान्यता दिली आहे, ज्यामुळे एकूण किंमत अंदाजे $93 दशलक्ष झाली आहे. भारत आणि अमेरिकेतील करार पाहून पाकिस्तानच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकली असणार आहे. भारताने रशियाकडून जवळपास तेल खरेदी बंद केली. आता अमेरिका भारतावरील अतिरिक्त टॅरिफ काढेल असे सांगितले जातंय. अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम भारतातील काही क्षेत्रांवर झाला असून अमेरिकेत होणार निर्यात कमी झालीये.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.