AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-अमेरिकेच्या संयुक्त निवेदनानंतर पाकिस्तानचा जळफळाट, म्हणाले, ‘आमचे बलिदान…’

India US Joint Statement: पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी भारत-अमेरिकेच्या निवेदनावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, अमेरिका आणि भारताचे हे विधान केवळ एकतर्फी नाही तर दिशाभूल करणारे आहे. राजनैतिक नियमांच्या विरोधात आहे. पाकिस्तानने केलेल्या बलिदानाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

भारत-अमेरिकेच्या संयुक्त निवेदनानंतर पाकिस्तानचा जळफळाट, म्हणाले, 'आमचे बलिदान...'
shehbaz-sharif
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 15, 2025 | 9:08 AM
Share

India US Joint Statement: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसोबत चार तास बैठक झाली. या बैठकीनंतर गुरुवारी वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त निवेदन जारी केले. दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनामध्ये पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा असल्याचा मुद्दाही होता. यासोबतच दहशतवादाबाबत पाकिस्तानवर कारवाई करण्यात यावी, असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. आता दोन्ही देशांच्या या संयुक्त निवेदनानंतर पाकिस्तानचा जळफळाट सुरु झाला आहे. या वक्तव्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानने काय म्हटले?

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी भारत-अमेरिकेच्या निवेदनावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, अमेरिका आणि भारताचे हे विधान केवळ एकतर्फी नाही तर दिशाभूल करणारे आहे. राजनैतिक नियमांच्या विरोधात आहे. पाकिस्तानने केलेल्या बलिदानाकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे. परंतु भारताचा दहशतवादाला असलेला पाठिंबा अशा गोष्टींमधून लपवता येणार नाही, असेही शफकत अली खान यांनी म्हटले.

भारत-अमेरिकेचे वक्तव्य काय होते…

26/11 आणि पठाणकोट हल्ल्यातील दोषींना पाकिस्तानने शिक्षा करावी, असे भारत आणि अमेरिकेने संयुक्त निवेदनात म्हटले आहे. यासोबतच पाकिस्तानने त्यांच्या भूमीचा वापर अन्य कोणत्याही देशात दहशतवादी कारवायांसाठी होणार नाही याची काळजी घ्यावी. दहशतवादासोबत जागतिक संकट म्हणून लढले पाहिजे. जगात कुठेही असणारे दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले पाहिजे.

ट्रम्प यांचा पाकिस्तानला इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे नाव न घेता मोठा इशारा दिला. ट्रम्प म्हणाले, या वर्षाच्या सुरुवातीपासून अमेरिकेने भारतासोबत अब्जावधी डॉलर्सची लष्करी खरेदी वाढवली आहे. जगासाठी धोकादायक बनलेल्या कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि भारत पूर्वीप्रमाणेच एकत्र काम करत राहतील. ट्रम्प यांना चीनसोबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी चीन हा महत्वपूर्ण देश आहे. चीनसोबत आमचे संबंध सुधारतील, अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं