America Tariff War : भारत-अमेरिकेत सुसंवाद, टॅरिफ टेन्शन दरम्यान ट्रेड डीलवर मोठी अपडेट!
America Tariff War : अमेरिकी सरकारसोबत रचनात्मक चर्चा झाल्याच सांगितलं. दोन्ही बाजूंनी एका नव्या व्यापार कराराच्या संभाव्य रुपरेखेचा विचार केला. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, लवकरच दोन्ही बाजुंमध्ये लाभकारी करारापर्यंत पोहोचण्यासाठी चर्चा होईल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेटेंट आणि ब्रांडेड औषधांच्या आयातीवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. 1 ऑक्टोंबरपासून हा टॅरिफ लागू होईल. फर्नीचरवर सुद्धा 50 टक्के टॅरिफ लावण्यात आलाय. या दरम्यान भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल एक मोठी अपडेट आहे. भारताच्या व्यापार मंत्रालयाने एक अधिकृत स्टेटमेंट दिलय. त्यानुसार, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय प्रतिनिधीमंडळाने 22-24 सप्टेंबर 2025 पर्यंत अमेरिकेसोबत अनेक बैठका केल्या. यात दोन्ही बाजूंकडून सकारात्मक प्रतिक्रिया आली आहे. असे संकेत मिळतायत की, लवकरच दोन्ही बाजूंकडून टॅरिफ कमी करण्यासाठी सहमती बनू शकते.
या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी प्रमुख अमेरिकी व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांसोबत चर्चा केली. त्याशिवाय अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी राजदूत जॅमीसन ग्रीर आणि भारतातील अमेरिकी राजदूत पदनाम सर्जियो गोर यांची भेट घेतली.
व्यापार ऑपरेशन्सचा विस्तार करण्याची इच्छा
अमेरिकी सरकारसोबत रचनात्मक चर्चा झाल्याच सांगितलं. दोन्ही बाजूंनी एका नव्या व्यापार कराराच्या संभाव्य रुपरेखेचा विचार केला. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, लवकरच दोन्ही बाजुंमध्ये लाभकारी करारापर्यंत पोहोचण्यासाठी चर्चा होईल. अमेरिकेतील अनेक कंपन्यांच्या लीडर्सनी भारताच्या विकासावर विश्वास व्यक्त केला. देशात व्यापार ऑपरेशन्सचा विस्तार करण्याची इच्छा व्यक्त केली.
ऊर्जा व्यापार विस्तारासाठी दबाव
सरकारी अधिकाऱ्यांनी बिझनेस टुडे टीव्हीला सांगितलं की, चर्चा अजूनही सुरु आहे. भारतीय व्यापार मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, पॉझिटिव्ह चर्चा सुरु आहे. भारताने 25 टक्के टॅरिफ हटवण्याची मागणी ठेवली आहे. त्यावर अमेरिकेची सुद्धा एक मागणी आहे. वॉशिंग्टन नवी दिल्लीवर ऊर्जा व्यापार विस्तारासाठी दबाव टाकत आहे.
भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ
फार्मावरील नव्या टॅरिफबद्दल मंत्रालयाने म्हटलय की, भारताच्या औषध क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करत आहोत. व्यापाराबद्दल आशावादी असताना भू-राजकीय स्थितीचा व्यापार चर्चेवर परिणाम होऊ शकतो. भारत अमेरिकेचा जवळचा मित्र आहे. पण, तरीही राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदीसाठी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला आहे.
