पाकिस्तानच्या जीडीपी इतकं आमचं केवळ आर्थिक पॅकेज, मदतीची ऑफर देणाऱ्या इम्रान खान यांना भारताच्या कानपिचक्या

पाकिस्तानमध्ये कोरोनाचा हाहा:कार उडाला आहे (Indian Foreign Ministry on Imran Khan). मात्र, तरीही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारताची चिंता सतावत आहे.

पाकिस्तानच्या जीडीपी इतकं आमचं केवळ आर्थिक पॅकेज, मदतीची ऑफर देणाऱ्या इम्रान खान यांना भारताच्या कानपिचक्या

लाहोर : पाकिस्तानमध्ये कोरोनाचा हाहा:कार उडाला आहे (Indian Foreign Ministry on Imran Khan). मात्र, तरीही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारताची चिंता सतावत आहे. एका रिपोर्टचा संदर्भ देत इम्रान खान यांनी भारतातील 34 टक्के कुटुंबांना मदत मिळाली नाही, तर ते आठवड्याभरापेक्षा जास्त काळ तग धरु शकणार नाहीत, असा दावा केला आहे. त्यामुळे त्यांनी ट्विटरवर भारताला मदतीची ऑफर दिली आहे. त्यांच्या याच ऑफरला भारताच्या परराष्ट्रीय मंत्रालयाने प्रत्युत्तर दिलं (Indian Foreign Ministry on Imran Khan).

भारताने कोरोना संकंट काळात जेवढ्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली तितका पाकिस्तानचा जीडीपी आहे, असं प्रत्युत्तर परराष्ट्रीय मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी इम्रान खान यांना दिलं. त्याचबरोबर “पाकिस्तान टेरर फंडींगसाठी कॅश ट्रान्सफर करत असल्याची जगभरात ख्याती आहे”, असा टोला त्यांनी लगावला.

एका रिपोर्टचा संदर्भ देत इम्रान खान यांनी भारतात कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील 34 टक्के कुटुंबांना मदत मिळाली नाही, तर ते आठवड्याभरापेक्षा जास्त काळ तग धरु शकणार नाहीत, असा दावा केला. “मी भारताला मदत करायला तयार आहे. आमच्या कॅश ट्रान्सफर प्रोग्रॅमचं आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील कौतुक केलं गेलं आहे”, असं इम्रान खान ट्विटरवर म्हणाले.

रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

मुंबईची ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग द इंडियन इकोनॉमी’ या संस्थेने ‘यूनिवर्सिटी ऑफ शिकागो’सोबत एक रिपोर्ट जारी केला आहे. हाच रिपोर्ट इम्रान खान यांनी शेअर केला. या रिपोर्टमध्ये भारतात लॉकडाऊनचे गंभीर परिणाम बघायला मिळत असल्याचं म्हटलं आहे.

“लॉकडाऊनचा भारतातील 84 टक्के कुटुंबाच्या उत्पन्नावर परिणाम पडला आहे. देशातील जवळपास एक तृतीयांश कुटुंबांना तातडीने आर्थिक साहाय्याची आवश्यकता आहे. कारण त्यांना मदत मिळाली नाही, तर ते आठवड्याभरापेक्षा जास्त काळ तग धरु शकणार नाहीत. त्यामुळे तातडीने त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करायला हवेत”, असं रिपोर्टमध्ये महटलं आहे.

संबंधित बातमी :

भारताला अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्र्याला कोरोना

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *