दगाबाजी करणाऱ्या मित्राच्या मदतीला धावला भारत, थेट मोठी घोषणा, तब्बल इतके अरबची…
भारताचा पक्का मित्र अडचणीत सापडला आहे. शेवटी भारत आपल्या मित्राच्या मदतीला धावून आला. भारताने मोठी रक्कम आपल्या मित्राला अडचणीमधून निघण्यासाठी दिली. मालदीव गेल्या काही दिवसांपासून आर्थिक तंगीत आहे. भारताने मालदीवला आर्थिक मदत केली.

भारत आणि मालदीवचे संबंध कायमच चांगली राहिली आहेत. गेल्या काही दिवसांपासून मालदीव सरकार मोठ्या आर्थिक तंगीत आहे. या परिस्थितीमध्ये भारत मालदीवच्या मदतीला धावला आहे. भारताने पुन्हा एकदा मालदीवला मोठी मदत जाहीर केली. मालदीव आर्थिक संकटात असल्याने थेटपणे भारताने त्यांची मदत केली. मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक तंगीत असलेल्या मालदीवला मोठा दिलासा देत भारत सरकारने 30 अरब रूपयांच्या पहिल्या मदतीसाठी मंजूरी दिली. ही रक्कम भारतीय रिझर्व बॅंक मालदीव सरकारच्या SAARC स्वॅप फ्रेमवर्कच्या माध्यमातून देईल. मालदीवची आर्थिक स्थिरता टीकून ठेवण्याकरिता ही रक्कम अत्यंत महत्वाची आहे. करेंगी स्वॅप फ्रेमवर्कची व्यवस्था भारतीय रिजर्व बँक आणि मालदीव सरकार यांच्यात झालेल्या करारात लागू आहे.
ऑक्टोबर 2024 मध्ये मालदीवचे पंतप्रधान मोहम्मद मुइज्जू यांनी भारत दाैऱ्यावर असताना हा करार केला होता. मालदीव सरकार सध्या प्रचंड मोठ्या आर्थिक तंगीत आहे. विदेशी मुद्राचा भांडार त्यांच्या हातून जाण्याची स्थिती आहे. यावेळी त्यांनी भारताची मदत मागितली. भारत देखील मालदीवच्या मदतीला धावून गेला. भारत आणि मालदीवमध्ये कायमच चांगले संबंध राहिले आहेत.
भारताने यापूर्वीही मालदीवला मदत केली आहे. भारताने आतापर्यंत मालदीवला 1.1 अरब डॉलरपेक्षा अधिक मदत केली आहे. गेल्याच वर्षी भारताने मालदीव सरकारच्या विनंतीनंतर 100 मिलियन डॉलरचे टेजरी बिल्स रोलओलर केले होते. काही दिवसांपूर्वी भारत आणि मालदीवचे संबंध तणावात आले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा संबंध सुधारल्याचे बघायला मिळत आहेत. मालदीव सरकारने घेतलेल्या भूमिकेनंतर भारताने लक्षदीपमध्ये पर्यटन वाढवण्यास सुरूवात केली.
लक्षदीपचा विकास झाल्यानंतर पर्यटकांनी मालदीवकडे पाठ फिरवल्याचे बघायला मिळत आहे. थेट मालदीवच्या पर्यटकाला मोठा फटका बसला आहे. जे पर्यटक अगोदर मालदीवला जात ते आता स्वतामध्ये असल्याने थेट लक्षदीपला जात आहेत. मालदीव सध्याच्या घडीला प्रचंड मोठ्या आर्थित तंगीत आहे. यातून मार्ग काढण्याकरिता भारताने मालदीवसाठी मदतीचा हात पुढे केला. या रक्कमेमुळे मालदीवला दिलासा मिळणार आहे.