AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेव्हा डेवचं डोकं तिच्या मांडीवर होतं, त्याच्या शरीरावर.. हनीमूनसाठी दोघे निघाले पण.. लग्नानंतर काही तासात सगळ्या कुटुंबाला शॉक

400 पाहुण्यांच्या उपस्थितीत डेव फिजीने जेस्नी सोबत लग्न केलं. या लग्नाला जवळपास 400 पाहुणे उपस्थित होते. दोघांची पहिली भेट 10 वर्षांपूर्वी न्यू टेस्टामेंटमध्ये झाली होती. डेव स्वत: वैमानिक होता. हेलिकॉप्टरमध्ये बसवून दोघांना निरोप दिला.

तेव्हा डेवचं डोकं तिच्या मांडीवर होतं, त्याच्या शरीरावर.. हनीमूनसाठी दोघे निघाले पण.. लग्नानंतर काही तासात सगळ्या कुटुंबाला शॉक
us chopper crashImage Credit source: social media
| Updated on: Jun 01, 2026 | 1:50 PM
Share

कोणाच्या नशिबात काय लिहून ठेवलय हे कोणीच सांगू शकत नाही. एखाद्या क्षणाचा आनंद दुसऱ्याक्षणी दु:खात बदलतो. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका कुटुंबासोबत असच घडलं. काही तासात या कुटुंबाचा आनंद दु:खात बदलला. हनीमूनला निघालेल्या भारतीय वंशाच्या नवरदेवाचा हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्देवी अपघातात मृत्यू झाला. नवरी मुलगी बरेच तास ढिगाऱ्यामध्ये अडकून पडली होती. सगळ्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. कारण या अपघाताच्या काही तास आधीच दोघांनी शेकडो पाहुण्यांसमोर नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यात ही दुर्घटना घडली. ज्या नवरदेवाचा मृत्यू झाला तो स्वत: वैमानिक होता.

अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यात हे हेलिकॉप्टर कोसळलं. त्यात वैमानिक असलेल्या नवरदेवाचा मृत्यू झाला. 26 वर्षाचा डेव फिजी डेल्टा एअर लाइन्समध्ये पायलट होता. त्यांचं कुटुंब मूळचं केरळचं आहे. डेव फिजी लग्नानंतर लगेच आपल्या पत्नीसोबत हनिमूनला चाललेला. वधू-वर दोघे रॉबिन्सन आर66 हेलिकॉप्टरमधून निघाले. लग्न झालं त्या ठिकाणीच डॉसनविल मध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं.

लग्नाला जवळपास 400 पाहुणे उपस्थित होते

डेव फिजी यांची नववधू पत्नी जेस्नी या अपघातात वाचली. ती पेशाने नर्स आहे. रिपोर्टनुसार, तिच्यावर अटलांटा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तिच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. डेवचे वडिल जॉर्ज फिजी अटलांटा न्यूज फर्स्टशी बोलताना म्हणाले की, “माझा मुलगा खूप खुश होता. शुक्रवारी त्याने जेस्नी सोबत लग्न केलं. दोघांची पहिली भेट 10 वर्षांपूर्वी न्यू टेस्टामेंटमध्ये झाली होती” डॉसनविल द रिवेरे येथे झालेल्या लग्नाला जवळपास 400 पाहुणे उपस्थित होते. लग्नाच्या रिसेप्शननंतर हे जोडपं रॉबिन्सन आर66 हेलीकॉप्टरमध्ये बसलं. ते हेलिकॉप्टरने डीकाल्ब-पीचट्री एअरपोर्टला चाललेले. जॉर्जिया मधलं ते दुसरं सर्वात व्यस्त एअरपोर्ट आहे.

अटलांटा शहरातील एका हॉटेलमध्ये ते रात्र घालवणार होते

हेलिकॉप्टरमधून या जोडप्याला खास निरोप देण्यात आला. अटलांटा शहरातील एका हॉटेलमध्ये ते रात्र घालवणार होते. पण हेलिकॉप्टर त्याआधीच कोसळलं. डॉसन काऊंटीच्या जंगल प्रदेशात माउंट वर्नन ड्राइवजवळ हे हेलिकॉप्टर कोसळलं. अपघाताची जागा लग्नाच्या वेन्यूपासून जास्त लांब नव्हती.

तेव्हा डेवचं डोकं तिच्या मांडीवर होतं

अपघातानंतर अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टर शोधून काढण्यासाठी बराच वेळ लागला असं जॉर्ज फिजी यांनी सांगितलं. नवरी जेस्नी जखमी झाली होती. जवळपास सहातास ती ढिगाऱ्याखाली होती. अखेर बचाव पथकाने तिला शोधून काढलं. “जेस्नीने डोळे उघडले, तेव्हा डेवचं डोकं तिच्या मांडीवर होतं. त्याच्या शरीरावर रक्त होतं. शरीर पूर्णपणे थंड पडलेलं. ती नर्स असल्यामुळे तिला कळून चुकलं की, डेव आता या जगात नाही. ती पूर्णपणे कोलमडून गेली. पण आता हळू हळू गोष्टी पूर्वपदावर येत आहेत” असं जॉर्ज फिजी यांनी सांगितलं.

Follow Us
ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा
Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा आरक्षणावरून सरकारला थेट सवाल
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग