पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट बेंजामिन नेतन्याहू यांना फोन, कोणत्याही क्षणी युद्ध…

अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर मोठी हल्ले केली जात आहेत. आयातुल्ला अली खामेनेई यांना एका हल्ल्यात अमेरिकेने ठार केले. या हल्ल्याबाबत धक्कादायक माहिती पुढे येत आहे. भारतीय नागरिक मोठ्या संख्येने इराण, इस्त्रायल आणि दुबई अडकले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट बेंजामिन नेतन्याहू यांना फोन, कोणत्याही क्षणी युद्ध...
Narendra Modi and Benjamin Netanyahu
| Updated on: Mar 02, 2026 | 8:15 AM

इराण आणि अमेरिकेतील संघर्ष वाढला आहे. अमेरिका,  इस्त्रायल इराणच्या विरोधात थेट मैदानात उतरले आहेत. मोठी हल्ले केली जात आहेत. युद्ध अधिक पेटताना दिसत आहे. अमेरिका आणि इस्त्रायल यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराण अधिकच आक्रमक भूमिकेत आहे. हेच नाही तर अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा मागील एका महिन्यांपासून आयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर लक्ष ठेऊन होती. त्यांचे प्रत्येक मिनिटाचे लोकेशन अमेरिकेला मिळत होते. शेवटी हल्ला करत अमेरिकेने आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार केले. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर आता इराणचे सर्वोच्च नेते म्हणून मोजतबा खामेनी यांची निवड करण्यात आली.

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात फक्त आयातुल्ला अली खामेनेई हेच नाही तर त्यांचा एक मुलगा, मुलगी, जावई आणि नातू मारला गेला. इराणकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आले की, आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. इराणने थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूचा फतवा काढला. मात्र, इराणच्या धमकीनंतर अमेरिकेने जगाचे टेन्शन वाढवणारी धमकी दिली आणि सर्वात मोठा हल्ला ज्याचा विचारही इराणने केला नसेल असा हल्ला आम्ही करू.

आता परिस्थिती अधिक चिघळत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट नेतन्याहू यांना फोन केल्याची माहिती मिळत आहे. नरेंद्र मोदी यांनी बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत चर्चा करत युद्ध रोखण्याची विनंती केली आहे. नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, पीएम बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत फोनवर बोलणे झाले. सध्याच्या परिस्थितीबद्दल त्यांच्यासोबत चर्चा केली आहे.

सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आणि नागरिकांच्या सुरक्षेबद्दलही बोलणे झाले. भारताने हे युद्ध रोखण्यावर अधिक जोर यादरम्यानच्या संभाषणात दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएई चे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन जायद अलनाहयान यांच्यासोबतही संवाद साधला. खाडी देशांवर झालेल्या हल्ल्याची निंदा केली. या वाईट काळात भारत युएईच्यासोबत असल्याचेही म्हटले.

इराणने केलेल्या साैदी अरेबियातील हल्ल्यात 58 भारतीय नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सध्याची परिस्थिती बघता सुरक्षा बैठक बोलावली. भारतीय नागरिक मोठ्या संख्येने दुबईसह अन्य देशात आहेत. त्यांच्याकडून मदत मागितली जात आहे. मात्र, सध्याची तेथील परिस्थिती अधिक खराब होताना दिसत आहे.

Follow Us