ट्रम्प झुकले तिथे विषयच संपला, युद्ध काळात इराणच्या मदतीसाठी भारताचा मोठा निर्णय

युद्ध काळात इराणच्या मदतीसाठी भारताने एक मोठा निर्णय घेतला आहे. यात आपला सुद्धा फायदा आहेच. पण इराणचा जास्त आहे. मध्य पूर्वेत सुरु असलेल्या या युद्धाने अवघड परिस्थिती निर्माण करुन ठेवली आहे. प्रत्येक देश आपला फायदा बघतोय.

ट्रम्प झुकले तिथे विषयच संपला, युद्ध काळात इराणच्या मदतीसाठी भारताचा मोठा निर्णय
War
Image Credit source: Representative Image
| Updated on: Mar 21, 2026 | 1:50 PM

अमेरिकेने इराणच्या तेल खरेदीवर असलेले निर्बंध शिथिल केले आहेत. आता भारतही इराणकडून तेल विकत घेणार आहे. अमेरिकेने तात्पुरते हे निर्बंध शिथिल केले आहेत. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज जवळपास ठप्प केलं आहे. या जलमार्गावरुन जवळपास 20 टक्के जागतिक तेल वाहतूक होते. आता हॉर्मुज बंद असल्यामुळे जगातील अनेक देशात तेल संकट निर्माण होऊ लागलं आहे. मागच्या काही दिवसांपासून भारतातही या इंधन संकटाच्या झळा जाणवत आहेत. भारताचं जवळपास 70 ते 80 टक्के एलपीजी या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून येतो. भारताची आतापर्यंत तीन ते चार जहाजं या मार्गावरून निघाली आहेत. 22 जहाजं अजूनही तिथेच अडकून पडली आहेत. जगात ही जी काही तेल टंचाई निर्माण झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी तेलावरील निर्बंध हटवले आहेत.

समुद्री मार्गांवर अडकलेल्या टँकर्समधील जवळपास 14 कोटी बॅरल इराणी तेलावरील प्रतिबंध हटवले आहेत. जागतिक तेल किंमती कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. समुद्रात अडकलेल्या इराणी जहाजांवर जवळपास 140 मिलियन बॅरल तेल आहे. इतक्या तेल साठ्यामुळे 10 दिवस ते दोन आठवडे जगाला तेल पुरवठा होऊ शकतो. 19 एप्रिल 2026 पर्यंत इराणच्या कच्च्या तेलाची आणि पेट्रोलियम उत्पादनांची विक्री व डिलीव्हरी करण्यास परवानगी देण्यात आलीय. 20 मार्चपर्यंत समुद्रात लोड झालेल्या तेलवाहू जहाजांना ही सूट लागू होते. याचा अर्थ असा की, पूर्वी अडकून पडलेले इराणचे तेल आता बाजारात विकले जाऊ शकेल.

भारताचा मोठा निर्णय

अमेरिकेकडून तात्पुरती सवलत मिळाल्यानंतर आता भारतीय आणि आशियाई तेल कंपन्या हे इराणी तेल विकत घेण्यासाठी सरसावल्या आहेत. भारतातील तीन तेल रिफायनरीजनी इराणी तेल विकत घेणार असल्याचं रॉयटर्सकडे स्पष्ट केलय. पेमेंट कसं करणार त्या बद्दल स्पष्टता नाहीय. इराण आधी रुपयामध्ये आपल्याला तेल विकायचं. पण अमेरिकेच्या दबावानंतर आपण इराणकडून तेल खरेदी खूप कमी केली होती.

तेल साठवणूक भंडाराची क्षमता कमी

कच्चा तेलाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली कोंडी लक्षात घेता इराण आता डॉलरच्या दराने बाजार भावानेच आपल्याला हे तेल विकू शकतो. चीनच्या तुलनेत आपल्याकडे तेल साठवणूक भंडाराची क्षमता कमी आहे. भारताकडे दोन महिने पुरेल इतका तेल साठा आहे. आपण जगातील जवळपास 40 देशांकडून तेल आयात करतो. भारताची तेलाची गरज प्रचंड आहे. आता आपण इराणकडून तेल विकत घेणार आहोत. कठीण काळात ही त्यांच्यासाठी एकप्रकारची मदतच असेल.

 

Follow Us