AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran War News : युद्धाच्या आडून स्वत:च्या फायद्यासाठी पुतिनच इराणचा मोठा गेम करण्याच्या तयारीत का? युद्धातलं पॉलिटिक्स

Iran War News : युद्धात फक्त परस्परांवर हल्ले-प्रतिहल्ले होत नाहीत, तर पडद्यामागे एक राजकारण चालतं. त्यात स्वहित जास्त पाहिलं जातं. सध्या सुरु असलेल्या मध्य पूर्वेतील युद्धाला असेच अनेक कंगोरे आहेत. आता रशियाला स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.

Iran War News : युद्धाच्या आडून स्वत:च्या फायद्यासाठी पुतिनच इराणचा मोठा गेम करण्याच्या तयारीत का? युद्धातलं पॉलिटिक्स
vladimir putin
| Updated on: Mar 21, 2026 | 1:07 PM
Share

अमेरिकेने जर युक्रेनला रशिया बाबत गोपनीय माहिती देणं थांबवलं, तर रशिया सुद्धा इराणला अशी मदत थांबवेल. क्रेमलिनने असा प्रस्ताव दिलाय. अशी एक बातमी सुरु आहे. अमेरिकी मिडिया पॉलिटिकोमध्ये या संबंधीचं वृत्त प्रसिद्ध झालय. मागच्या आठवड्यात मियामी येथे व्लादीमीर पुतिन यांचे दूत किरील दिमित्रीव आणि ट्रम्प प्रशासनातील अधिकारी स्टीव्ह विटकॉफ, जेरार्ड कुशनर यांच्यात एक बैठक पार पडली. त्यावेळी पुतिन यांच्याकडून ही ऑफर देण्यात आल्याचं बातमीत म्हटलं आहे. रशियाने मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. रशियाने फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेन विरुद्ध युद्ध पुकारलं. तेव्हापासून अमेरिका युक्रेनला रशियन सैन्याच्या पोजिशनची माहिती देत आहे. आता रशिया सुद्धा इराणी सैन्याला अमेरिकेच्या सैन्य पोजिशनची माहिती देतो. त्यामुळे इराणला अचूक मिसाइल हल्ले करणं शक्य होत आहे.

ही सर्व उपग्रह आधारित माहिती आहे. दिमित्रीव यांनी अमेरिकेला अशी कुठली ऑफर दिल्याची माहिती फेटाळली आहे. हे वृत्त निराधार, चुकीचं असल्याचं एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. रिपब्लिकन खासदार अन्ना पॉलिना यांनी या वृत्ताबद्दल पॉलिटिकोवर टीका केली आहे. “पॉलिटिकोला व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश नाहीय. अंतर्गत चर्चा किंवा रशियासोबतच्या शांतता चर्चांबद्दल काही माहिती नाहीय. अमेरिका आणि रशियामधील तणाव वाढवण्याच्या त्यांच्या या प्रयत्नाकडे दुर्लक्ष करा” असं पॉलिना यांनी म्हटलं आहे.

रशिया इराणला काय मदत देतोय?

युद्ध सुरु झाल्यापासून रशिया इराणला अमेरिकी युद्धनौका आणि मध्य पूर्वेतील विमानांच्या लोकेशन्सची माहिती देत आहे असं वृत्त या महिन्याच्या सुरुवातीला द वॉशिंग्टन पोस्टने दिलं होतं. क्रेमलिन म्हणजे रशियाने त्यावेळी सुद्धा ही बातमी फेटाळून लावलेली. 28 फेब्रुवारीला युद्ध सुरु झालं. तेव्हापासून रशिया मानवी दृष्टीकोनातून इराणला मदत करत आहे. पण इराणला काय मदत करतायत त्यावर जाहीरपणे बोलणं रशियाने टाळलं आहे.

शाहेद ड्रोन्स दिले

युक्रेन विरुद्ध युद्धात इराण रशियाचा मुख्य सहकारी बनला होता. युद्ध सुरु झाल्यानंतर इराणने मॉस्कोला युक्रेनियन शहरांवर डागण्यासाठी शाहेद ड्रोन्स दिले. त्यामुळे आता इराणवर वेळ आल्यानंतर रशिया त्या मदतीची परतफेड करणार हे सुद्धा तितकच खरं आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?