AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Test Cricket : न्यूझीलंडकडून इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम जाहीर, मॅचविनर गोलंदाजाचं कमबॅक

New Zealand vs England Test Series 2026 : न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आयर्लंड आणि इंग्ल्ंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम जाहीर केली आहे. या कसोटी सामन्यानिमित्ताने न्यूझीलंडच्या संघात दुखापतीनंतर काही खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. जाणून घ्या कुणाला संधी मिळाली आहे.

Test Cricket : न्यूझीलंडकडून इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम जाहीर, मॅचविनर गोलंदाजाचं कमबॅक
New Zealand Test CricketImage Credit source: blackcaps x account
| Updated on: May 07, 2026 | 7:01 PM
Share

क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल 2026 स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना सुरुवात होणार आहे. टीम इंडिया आयर्लंड आणि झिंबाब्वे दौरा करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड क्रिकेट टीम आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्ध कसोटी सामने खेळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून या दोन्ही संघांविरूद्धच्या कसोटी सामन्यांसाठी टीम जाहीर केलीय. याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन देण्यात आली आहे.

न्यूझीलंडचा आयर्लंड दौरा

न्यूझीलंड आयर्लंड विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. आयर्लंडसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. न्यूझीलंडची आयर्लंडमध्ये कसोटी सामना खेळण्याची पहिलीच वेळ ठरणार आहे. उभयसंघातील एकमेव सामना हा 27 मे पासून बेलफास्ट इथे खेळवण्यात येणार आहे. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळी अंतर्गत होणार नाहीय.

न्यूझीलंडचा इंग्लंड दौरा

न्यूझीलंड या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यानंतर इंग्लंड दौऱ्याला रवाना होणार आहे. न्यूझीलंड इंग्लंड विरुद्ध एकूण 3 कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेला 4 जूनपासून सुरुवात होणार आहे.मालिकेतील सलामीचा सामना हा लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये होणार आहे. या मालिकेतून न्यूझीलंड टीममध्ये काही खेळाडूंचं कमबॅक झालं आहे.

इंग्लंड विरूद्धच्या मालिकेतून न्यूझीलंड संघात कायल जेमीसन याचं तब्बल 2 वर्षांनंतर कमबॅक झालंय. कायलला दुखापतीमुळे कसोटी संघापासून 2 वर्ष दूर रहावं लागलं होतं. तसेच विलियम ओ रुर्के हा देखील परतला आहे. विलियमला पाठीच्या दुखापतीमुळे टीममधून बाहेर रहावं लागलेलं.

न्यूझीलंड टेस्ट सीरिजसाठी सज्ज

ऑलराउंडरला पहिल्यांदाच संधी

दरम्यान देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऑलराउंड डीन फॉक्सक्रॉफ्ट याने जबरदस्त कामगिरी केली होती. तसेच डीनने बांगलादेश विरुद्ध व्हाईट बॉल सामन्यात आपला ठसा उमटवला होता. डीनला या कामगिरीच्या जोरावर पहिल्यांदाच कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.

कसोटी सामन्यांसाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), केन विलियमसन, डेव्हॉन कॉनव्हे, कायल जेमिसन, विलियम ओरूर्के, डीन फॉक्सक्रॉफ्ट, मॅट हेनरी, डॅरेल मिचेल, हेनरी निकोल्स, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सियर्स, नॅथन स्मिथ, ब्लेयर टिकनर, झॅक्री फाउल्क्स. क्रिस्टियन क्लार्क (फक्त आयर्लंड विरुद्ध), मायकल राय (फक्त आयर्लंड विरुद्ध) आणि विल यंग (फक्त आयर्लंड विरुद्ध).

Follow Us
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच....
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका.
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर...
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर....
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी.
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी...
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी....
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच.
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार.....
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार......
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात...
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात....