Sushma Andhare | आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर सुषमा अंधारेंची थेट मागणी; म्हणाल्या….
राज्यातील महिला सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि लैंगिक अत्याचारांच्या घटनांवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
राज्यातील महिला सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि लैंगिक अत्याचारांच्या घटनांवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
“पीडितांवर लाठीचार्ज केला जातो, आंदोलन करणाऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न होतो, हे अत्यंत गंभीर आहे. बालिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे,” असे म्हणत त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर टीका केली. तसेच, गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल न देण्याच्या मंत्रिमंडळ निर्णयावर भाष्य करताना, “अटकपूर्व जामीनच कसा मिळतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सुषमा अंधारे यांनी ‘शक्ती कायदा’ लागू करण्याच्या मुद्द्यावरूनही सरकारला धारेवर धरले. “महाविकास आघाडी सरकारने आणलेला शक्ती कायदा लागू करण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. राजकारण आम्ही करत नाही, सरकारच करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
महिला व बालकल्याण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी महिला आयोगातील रिक्त पदांवरही टीका केली. “महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत सरकार संवेदनशील दिसत नाही. महिला आयोग अद्याप रिक्त का आहे?” असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. “मंत्रीपदाची जबाबदारी पेलत नसेल तर राजीनामा द्यावा,” असे वक्तव्य करत त्यांनी विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
या सर्व वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत.
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी...
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार.....

