AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अखेर ज्याची भीती होती तेच घडलं, थलपती विजय यांना 440 होल्टचा झटका, राज्यपालांनी थेट.., राज्यात आंदोलन पेटलं

तामिळनाडूच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षानं राज्यात 108 विधानसभेच्या जागा जिंकल्या आहेत. मात्र तरी देखील पक्ष आता मोठ्या अडचणीत सापडला आहे.

मोठी बातमी! अखेर ज्याची भीती होती तेच घडलं, थलपती विजय यांना 440 होल्टचा झटका, राज्यपालांनी थेट.., राज्यात आंदोलन पेटलं
thalapathy vijayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 07, 2026 | 7:05 PM
Share

तामिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठा गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणूक निकालामध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला तामिळनाडूमध्ये मोठं यश मिळालं. टीव्हीकेने दोन्ही द्रवीड पक्षांना मोठा धक्का दिला आहे. एआयएडीएमके आणि डीएमकेची या निवडणुकीत मोठी पिछेहाट झाली आहे. तर टीव्हीकेला राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. टीव्हीकेला तामिळनाडूमध्ये 108 जागा मिळाल्या आहेत. मात्र जरी असं असलं तरी देखील त्यांना राज्यात बहुमत मिळवता आलेलं नाही. जर तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करायची असेल तर कोणत्याही पक्षाकडे 118 एवढं संख्याबळ असणं गरजेचं आहे. टीव्हीकेला बहुमतासाठी दहा जागांची गरज होती. त्यात काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे टीव्हीकेकडे आता 112 एवढं संख्याबळ झालं आहे. मात्र तरी देखील टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी आणखी सहा आमदारांची गरज आहे.

त्यामुळे टीव्हीकेकडून आता बहुमतासाठी पक्षांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार थलपती विजय यांनी एआयएडीएमकेकडे देखील पाठिंबा मागितला होता. मात्र एआयएडीएमकेनं टीव्हीकेला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सध्या टीव्हीकेला बहुमताचा आकडा गाठताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान बुधवारी थलपती विजय हे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे गेले होते. त्यांनी 112 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं. परंतु राज्यापालांनी त्यांना 118 आमदारांच्या सह्यांचं पत्र सादर करण्यास सांगितलं आहे.

दरम्यान त्यानंतर थलपती विजय हे आज दुसऱ्यांदा सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनात पोहोचले होते. मात्र यावेळी देखील त्यांना मोकळ्या हातानेच माघारी फिरावं लागलं. त्यामुळे आता टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटल्याचं पहायला मिळत आहे. राजभवनाबाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. राज्यपाल जाणूनबुजून विलंब करत आहेत. राज्यपाल भाजपचा पक्ष घेत आहेत, असा आरोप या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. बहुमत हे विधानसभेत सिद्ध होतं, राजभवनात नाही. टीव्हीकेनं तामिळनाडूत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे राज्यपालांनी आता नियमानुसार टीव्हीकेला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण द्यायला पाहिजे, अशी मागणी कर्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. दरम्यान आात टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांनी तामिळनाडूमध्ये आंदोलन सुरू केलं असून, ते अधिक आक्रमक बनले आहेत, पोलीस यंत्रणेवरील ताण वाढला आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?