AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mayor Ritu Tawde | सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार, म्हणाल्या ही केवळ अफवा....

Mayor Ritu Tawde | सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार, म्हणाल्या ही केवळ अफवा….

| Updated on: May 07, 2026 | 3:42 PM
Share

मुंबईत मासेविक्रीवर निर्बंध घालण्यात आल्याच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापले असून, या संदर्भातील वृत्तांवर आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मच्छी कापून किंवा साफ करून विकण्यास मनाई करण्यात आल्याची बातमी काही माध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर कोळी बांधवांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, याबाबत बोलताना महापौर रितू तावडे यांनी हे वृत्त पूर्णपणे अफवा असल्याचा दावा केला आहे. “ही बातमी केवळ सामनामध्ये प्रसिद्ध झाली आहे. कोणत्याही अधिकृत माध्यमाच्या पेजवर किंवा वृत्तवाहिनीवर अशी माहिती देण्यात आलेली नाही,” असे त्या म्हणाल्या. तसेच, “मी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी आणि संबंधित विभागाशी चर्चा केली असून, अशा प्रकारचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत,” असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. प्रशासनाकडून मासेविक्रीबाबत कोणतेही नवीन निर्बंध लागू करण्यात आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रितू तावडे यांनी उद्धव ठाकरे गटावरही जोरदार टीका केली. “उबाठा गटाकडे आता कोणतेही मुद्दे उरलेले नाहीत. त्यामुळे खोट्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. याशिवाय, “मी कोळी बांधवांसोबत आहे. त्यांना मासे कापण्यापासून कोणीही रोखू शकत नाही,” असे ठाम वक्तव्य करत त्यांनी कोळी समाजाला पाठिंबा दर्शवला.

Published on: May 07, 2026 03:42 PM
Follow Us