अमेरिका इराण युद्धात भारताला मोठा दणका, हजारो जहाज समुद्रकिनारी, थेट अर्थव्यवस्थेवर..

इराण आणि अमेरिका युद्धामुळे अनेक व्यवसायांवर मोठे संकट आहे. भारतात मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसची समस्या आहे. यादरम्यानच मासेमारी व्यवसाय देखील संकटात आहे. मासेमारी हा भारतातील प्रमुख उद्योगांपैकी एक आहे.

अमेरिका इराण युद्धात भारताला मोठा दणका, हजारो जहाज समुद्रकिनारी, थेट अर्थव्यवस्थेवर..
US-rain war
| Updated on: Apr 05, 2026 | 8:58 AM

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जग संकटात आहे. ऊर्जेचे मोठे संकट आहे. युद्ध थांबवण्याची मागणी होत असताना युद्ध अधिक भडकताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा भारताला मोठा फटका बसत आहे. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. व्यावसायिक सिलेंडर वितरण बंद करण्यात आले. भारताची स्थिती त्या तुलनेत चांगली आहे, इतर देशांची स्थिती वाईट आहे. होर्मुज खाडीतून भारताच्या जहाजांना मार्ग दिला जात आहे. मात्र, गॅस प्रकल्प आणि तेल रिफायनरीवर थेटपणे हल्ले केले जात आहेत. इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका महाराष्ट्र आणि गोव्याच्या मच्छिमारांना बसत आहे. हजारोंच्या घरात जहाज समुद्र किनाऱ्यावर उभे आहेत. मच्छिमारांचे म्हणणे आहे की, एलपीजी सिलेंडरच्या कमीमुळे त्यांना जहाजावर जेवण तयार करण्यामध्ये मोठ्या समस्या येत आहेत.

स्टोवचा वापर करून दिवस ढकलण्याचे काम त्यांच्याकडून सध्याच्या परिस्थितीला सुरू आहे. हिंदूस्थान टाईम्सला बोलताना मच्छिमारांनी म्हटले की, आज एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. जर ब्लॅकमध्ये बाजारात सिलेंडर घेण्याकरिता गेलो तर त्याचा भाव 10 हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे ते घेणेही परवडत नाही. सध्या आम्ही स्टोववर जेवण तयार करत आहोत.

पण त्याला सीमा आहेत. आता गेल्या एका महिन्यांपेक्षा अधिक काळापासून हे करत आहोत. यासोबतच डिझेलची वेगळीच समस्या आहे. त्यांच्या जहाजाला 15 दिवसात साधारणपणे 2000 ते 3000 लीटर डिझेल लागते. त्यांना बल्कमध्ये डिझेल घ्यावे लागते, त्याची किमत वाढली आहे. आजच्या घडीला मुंबईमध्ये 122 रूपये प्रती लीटर डिझेल मिळते. जे अगोदर 80 रूपये प्रति लीटर मिळत होते. राज्य सरकारकडून मच्छिमारांना डिझेलवर सबसिडी मिळते.

सध्याच्या या काळात अनेक मच्छिमारांनी फिशिंग कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी म्हटले की, जर चार दिवसांकरिता फिशिंगवर केले तर जहाजात किती नाही म्हटले तरीही 4 ते 5 लोक असतात. या लोकांना जेवणाकरिता एलपीजी गॅसची गरज असते. डायरेक्टरेट ऑफ प्लानिंग स्टेटिस्टिक्स अॅन्ड इव्हेलुशनच्या 2024-2025 नुसार, गोव्यातील समुदात 1.27 लाख टन फिसिंग करण्यात आली. ज्याची किमत जवळपास 2300 कोटी होती. अमेरिका, चीन, आशिया, युरोपला हे मासे गेले. मच्छिमारीमुळे अनेक लोकांना काम मिळते. माष या युद्धामुळे हा व्यावसाय देखील संकटात आला.

Follow Us