लग्नापूर्वी शारीरिक संबंधावर ‘या’ देशाने लावले निर्बंध, कायदा पास करून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला ठरविले बेकायदेशीर

मुस्लिम बहुल देश असलेल्या इंडोनेशियामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप आणि विवाह बाह्य संबंधांना गुन्हा ठरविणारा कायदा मंजूर झाला आहे.

लग्नापूर्वी शारीरिक संबंधावर या देशाने लावले निर्बंध, कायदा पास करून लिव्ह इन रिलेशनशिपला ठरविले बेकायदेशीर
लिव्ह इन पार्टनरकडून प्रेयसीची हत्या
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 06, 2022 | 3:06 PM

जकार्ता,  इंडोनेशियामध्ये (Indonesia) लग्नापूर्वी शारीरिक संबंध आणि लग्नाशिवाय लिव्ह-इनमध्ये (Live In relationship) राहण्यास आता बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी, इंडोनेशियन संसदेने विवाहपूर्व लैंगिक संबंध आणि लिव्ह-इन संबंधांना गुन्हा ठरवणारा नवीन कायदा मंजूर केला. टीकाकारांनी सरकारचे हे पाऊल देशाच्या स्वातंत्र्याला मोठा धक्का मानला आहे. यापूर्वी, अधिकार गटांनी या कायद्याला  विरोध केला होता. या कायद्यामुळे देश कट्टरतावादाकडे वळल्याचा निषेध केला होता.

कायदा आणि मानवाधिकार मंत्री यासोना लाओली म्हणाल्या, “आम्ही वादविवाद झालेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांना आणि भिन्न मतांना सामावून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या नियमाचा इंडोनेशियातील LGBTQ समुदायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे, जिथे समलिंगी विवाहाला परवानगी नाही.

कायदा विवाह संस्थांना संरक्षण मिळेल

इंडोनेशियाच्या या नवीन विधेयकाच्या कलम 413 (1) नुसार, जर एखादी व्यक्ती अशा व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवते. जे एकमेकांचे पती किंवा पत्नी नसतील. तर त्याला या व्याभिचारासाठी 1 वर्ष सश्रम कारावास किंवा श्रेणी II अंतर्गत मोठ्या दंडाची शिक्षा दिली जाणार आहे.

केवळ जोडीदार, पालक किंवा मुलं विवाहपूर्व लैंगिक संबंध आणि विवाहबाह्य संबंधांची तक्रार करू शकतील. यासाठी पुराव्यानिशी संबंधीत अधिकाऱ्यांकडे तक्रार करणे अनिवार्य असेल.

भारतात लिव्ह इन रिलेशनशिपबाबत काय कायदा आहे?

कलम २(f) नुसार, लग्न करुन अथवा लग्न न करता एकत्र घरात राहणाऱ्या जोडप्याला लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचा दर्जा दिला जाईल. दिल्ली उच्च न्यायालयाने वर्षा कपूर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरणात विवाहाप्रमाणेच नातेसंबंधात राहणाऱ्या महिला जोडीदाराला तिचा पती/पुरुष जोडीदार तसेच त्याच्या नातेवाईकांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे.

दरम्यान, सौदी अरेबिया, इराण, पाकिस्तान, मालदीव, यूएई या इस्लामिक देशात लिव्ह इन रिलेशनशिप व्यभिचार मानला जातो. तसेच लिव्ह-इन रिलेशनशिप, समलिंगी संबंध इस्लामिक धर्मग्रंथांतर्गत प्रतिबंधित आहेत. लग्नात संमती महत्त्वाची भूमिका बजावत असली तरी, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये लग्नाआधी नातेसंबंध ठेवणे निषिद्ध मानले जाते.