AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जंगलात गेलेल्या महिलेला अजगराने जिवंत गिळले, कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?

महिलेला अजगराने जिवंत गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

जंगलात गेलेल्या महिलेला अजगराने जिवंत गिळले, कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?
अजगराने महिलेला गिळले Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 27, 2022 | 7:52 AM
Share

जाम्बी, एका महाकाय अजगराने 54 वर्षीय महिलेला जिवंत गिळल्याचा (Swallowed by the python) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर  अजगराला मारून  महिलेचा (Women) मृतदेह बाहेर काढण्यात आला. रबर गोळा करण्यासाठी जंगलात गेलेली हि महिला शुक्रवारपासून बेपत्ता होती. त्यानंतर दोन दिवसांनी महिलेला गिळलेला अजगर स्थानिक लोकांना सापडला. अजगराचे पोट फुगले होते. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, हे धक्कादायक प्रकरण जाम्बी प्रांतात (इंडोनेशिया) समोर आले आहे. 54 वर्षीय जरह नामक महिला  शुक्रवारी रात्री जंगलातून अचानक बेपत्ता झाली. ती बेपत्ता झाल्यानंतर स्थानिकांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली. सुमारे दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर लोकांना जंगलात एक अजगर सापडला, ज्याचे पोट फुगले होते. यानंतर या लोकांनी अजगराला ठार मारले व अजगराला कापून महिलेचा मृतदेह बाहेर काढला.

तसे, अशा महाकाय अजगरांना त्यांचे शिकार गिळण्यास कित्येक आठवडे लागतात. पण या अजगराने महिलेचे कपडे चघळण्यापर्यंत तिच्या शरीराचा बराचसा भाग गिळला होता. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत महिला शुक्रवारी घरी  परतली नाही. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक लोकांनी या अजगराचे पोट फाडून महिलेचा मृतदेह बाहेर काढला.

गावकऱ्यांमध्ये दहशत

या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे,  कारण अलीकडच्या काळात त्यांच्या परिसरात अनेक मोठे साप दिसले आहेत. यापूर्वी 27 फुटांचा अजगरही स्थानिक नागरिकांनी पकडला होता. तो पकडण्यासाठी लोकांना खूप संघर्ष करावा लागला होता. यापूर्वी दोन शेळ्याही अजगराने गिळल्या होत्या.

इंडोनेशियामध्ये लांब आकाराचे अजगर मोठ्या प्रमाणात आढळतात. हे अजगर जंगलात आढळतात आणि मुख्यतः प्राण्यांना लक्ष्य करतात. यापूर्वी 2017 मध्ये अकबर सलुबिरो नावाच्या व्यक्तीचा मृतदेहही अजगराचे पोट फाडून बाहेर काढण्यात आला होता. पश्चिम सुलावेसी येथे अजगराने त्याला जिवंत गिळले होते.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.