AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोसादची अजून एक खतरनाक कथा; Whatsapp च्या मदतीने असा केला हमास नेत्याचा खात्मा, ही थरारक Inside Story वाचली का?

Mossad Ismail Haniyeh WhatsApp Killing: इराणच्या तेहरानमध्ये हमासचे सर्वोच्च नेते इस्माईल हानिया यांचा इस्त्राईलने खात्मा केला. यामागे त्यांची गुप्तहेर संघटना मोसादचा हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण Whatsapp ने केला हमासच्या सर्वोच्च नेत्याचा खात्मा केल्याचा अंदाज आहे.

मोसादची अजून एक खतरनाक कथा; Whatsapp च्या मदतीने असा केला हमास नेत्याचा खात्मा, ही थरारक Inside Story वाचली का?
Mossad ची अजून एक थराराक प्लॅन
| Updated on: Aug 02, 2024 | 9:21 AM
Share

इराणमध्ये हमासचा सर्वोच्च नेता इस्माईल हानिया याच्यावर हल्ला झाला, यात ते ठार झाले. व्हॉट्सॲपमुळे हानिया यांचा खात्मा झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात येत आहे. त्यामुळे जगात एकच चर्चा रंगली आहे. हानिया यांना मारण्यासाठी ते थांबलेल्या ठिकाणी क्षेपणास्त्र डागण्यात आली. व्हॉट्सॲप कनेक्शनमुळे त्याच्यावर थेट हल्ला करणे सोपे झाल्याचा दावा करण्यात येत आहे. इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसादचा या हल्ल्यात हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. मोसाद ही तिच्या खतरनाक प्लॅन आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी ओळखल्या जाते.

व्हॉट्सॲपचे काय कनेक्शन

हानिया यांच्या लोकेशनची माहिती व्हॉट्सॲपमुळे मिळाली होती. Whatsapp चा सहसंस्थापक बोरिसोविच याचे या हल्ल्याशी कनेक्शन जोडण्यात येत आहे. बोरिसोविच हा यहुदी धर्माला मानतो. यहुदी धर्माला मानणारे सर्वच जण इस्त्राईलची मदत करत आहे. एका मतप्रवाहानुसार, बोरिसोविच यानेच हानिया यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲपमधून हेरगिरी केली आणि त्याच्या ठिकाण्याची माहिती इस्त्राईलच्या गुप्तहेर संघटनेला दिली. त्याआधारे हानिया राहत असलेल्या ठिकाणी मिसाईल डागण्यात आली.

असा होता खतरनाक प्लॅन

हानिया जेव्हा तेहरान येथे एका सुरक्षित ठिकाणी होते. त्यांनी सोबत आणलेल्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप होते. तेव्हाच त्यांचा मृत्यू निश्चित झाला होता. इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसादने हानिया यांच्या स्मार्टफोनवरील व्हॉट्सॲपवर एक स्पाईवेअर मॅसेज पाठवला. स्पाईवेअर हे एक प्रकारचे मोबाईल ॲप आहे. हानिया याने जसा हा मॅसेज वाचला. तेव्हाच त्याच्या मोबाईलमध्ये हे ॲप आपोआप इन्स्टॉल झाले. तेव्हाच हानियाची गुप्त माहिती मोसादला मिळू लागली. हानिया यांची हेरगिरी सुरु झाली.

स्पाईवेअरने पुढील काम सहज केले. हानिया यांच्या मोबाईलचे अचूक ठिकाण थेट इस्त्राईलमधील मोसादच्या कंट्रोल रुमला मिळाले. व्हॉट्सॲपने हानिया यांचा घात केला. लोकेशन माहिती होताच, तिथे थेट क्षेपणास्त्र डागण्यात आले. त्यात हानिया यांना पळून जाण्याची संधीच मिळाली नाही. इराणमधील सुरक्षित ठिकाण असून सुद्धा हानिया मारल्या गेले. त्यांच्या थेट बेडरुमपर्यंत क्षेपणास्त्र पोहचले. यापूर्वी पण मोसादने गाझा पट्टीत आणि लेबनानमध्ये अनेक विरोधकांचा असाच खात्मा केला आहे. ही एक मोठी थरार कथा आहे. मोसादच्या कारनाम्यांची यादी छोटी नाही. त्यात अनेक थरार कथांचा पट एकामागून एक असा जातो, तो संपतच नाही.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना