International Flights: अखेर दोन वर्षांनंतर भारताच्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सामान्य होणार

कोरोना महामारीनंतर मार्च 2020 पासून भारतातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली होती. भारतातून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे या वर्षाच्या अखेरीस पुन्हा सुरू होतील. सध्या वंदे भारत मिशन अंतर्गत विमानसेवा सुरू आहे, मात्र ते काही देशांपुरतं मर्यादित आहे.

International Flights: अखेर दोन वर्षांनंतर भारताच्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सामान्य होणार
Air services to resume normally
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 6:07 PM

नवी दिल्लीः जवळपास दोन वर्षांनंतर भारताच्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सामान्य होणार आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, भारतातून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे या वर्षाच्या अखेरीस पुन्हा सुरू होतील. सध्या वंदे भारत मिशन अंतर्गत विमानसेवा सुरू आहे, मात्र ते काही देशांपुरतं मर्यादित आहे. अशा परिस्थितीत या वर्षाच्या अखेरीस सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा सामान्य होण्याची अपेक्षा आहे.

कोरोना महामारीनंतर मार्च 2020 पासून भारतातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली होती. ही स्थगिती 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली होती. बुधवारी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल यांनी माहिती दिली की, नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे या वर्षाच्या अखेरीस पुन्हा सुरू होतील, अशी अपेक्षा आहे.

काही दिवसांपुर्वी, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले होते की सरकार आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पुन्हा सामान्य करू इच्छिते आणि त्यासाठी पुढील प्रक्रिया केले जात आहे. भारताच्या विमान उद्योगाची स्थिती अजूनही हवी तेवढी चांगली नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पर्यटनासाठी प्रवास करणारे लोक अजूनही कमी आहे आणि ही टक्केवारी महामारीपूर्वीचीच्या टक्केवारीपेक्षा फार कमी आहे. एअर विस्ताराने या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले की, भारतातील नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे लांबणीवर टाकल्याने बहुतेक विमान कंपन्यांवर आर्थिक परिणाम होत आहे.

सध्या भारताने यूएस, यूके, यूएई, केनिया, भूतान आणि फ्रान्ससह सुमारे 28 देशांशी एअर-बबल करार केले आहेत. एअर बबल करारांतर्गत, दोन देशांदरम्यान त्यांच्या एअरलाइन्सच्या वतीने निर्बंधांसह विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवता येत आहेत.

दरम्यान, अनेक भारतीय प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकले नाव्हते कारण WHO द्वारे Covaxin ला मान्यता नव्हती. ज्यांनी कोविशील्ड घेतले होते तेच लोक प्रवास करू शकत होते. पण मागच्या महिन्यात, Covaxin ला WHO ची मान्यता मिळाल्यानंतर 96 हून अधिक देशांनी ते स्वीकारले आहे. WHO ने आतापर्यंत EUL (इमर्जन्सी यूज लिस्ट) मध्ये 8 लसींचा समावेश केला आहे. यापैकी 2 भारतीय लसी – कोवॅक्सिन (Covaxin) आणि कोविशील्डचा (Covishield) समावेश आहे.

इतर बातम्या-

VIDEO: झारखंडचे मंत्री परत चर्चेत, India-Newzeland मैचदरम्यान भडकून स्टेडियमच्या बाहेर पडले

दलित चळवळीतील ‘चंद्रूं’चा शुक्रवारी सन्मान, डॉ आंबेडकर मालिकेतील सुभेदार रामजीबाबा शुक्रवारी घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत!