VIDEO: झारखंडचे मंत्री परत चर्चेत, India-Newzeland मैचदरम्यान भडकून स्टेडियमच्या बाहेर पडले

हाफिझुल अन्सारींनी वाद निर्माण करण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या महिन्यात एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जिवंत असताही आदरांजली दिली होती. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी एक मिनिट मौनही पाळले होते.

VIDEO: झारखंडचे मंत्री परत चर्चेत, India-Newzeland मैचदरम्यान भडकून स्टेडियमच्या बाहेर पडले
Jharkhand minister viral video
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 5:02 PM

रांचीः झारखंडचे क्रीडा मंत्री हाफिझुल अन्सारी  (Jharkhand sports minister Hafizul Ansari) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया चांगलाच व्हायरल होत आहे. 19 नवंबरचा रांचीच्या जेएससीए इंटरनेशनल मधला हा व्हिडिओ आहे, ज्यात मंत्री हाफिझुल अन्सारी एका व्यक्तीसोबत भांडताना दिसत आहेत. भारत-न्यूजीलैंड मैच चालू असताना स्टेडियममध्ये मंत्र्यांसाठी केलेली व्यवस्था पाहून ते संतापले होते. क्रिकेट सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाऊन तिथे टीव्हीवर सामना पाहावा लागतोय, या गोष्टीवर मंत्री महोदय भडकले. त्यांना संताप अनावर झाला नाही आणि ते सामना मध्येच सोडून स्टेडियमच्या बाहेर पडले. झारखंडच्या क्रीडामंत्र्यांसोबत फजिती झाली म्हणत त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

काय होती घटना?

आज तकच्या वृत्तानुसार, 19 नोव्हेंबर रोजी रांचीच्या JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड सामना सुरू होता. झारखंडचे क्रीडा मंत्री हाफिझुल अन्सारीही सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले. हाफिझुल अन्सारी यांच्यासह झारखंडचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो आणि अनेक आमदार मंत्रीही सामना पाहण्यासाठी आले होते.  मात्र थोड्याच वेळात मंत्र्यांसाठी स्टेडियममध्ये केलेली व्यवस्था पाहून क्रीडामंत्री हाफिझुल अन्सारी भडकले आणि एका कर्मचाऱ्यावर ओरडायला लागले. हा मंत्र्याचा प्रोटोकॉल आहे का म्हणत खुर्च्या, काचा इत्यादी गोष्टींवर ते नाराजी व्याक्त करत होते. संतप्त क्रीडामंत्र्यांना शांत करण्यासाठी स्टेडियमचे कर्मचारी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, पण मंत्र्यांचा राग शांत होत नाही, असंही त्या व्हिडिओ दिसत आहे. या घटनेमुळे स्टेडियममध्ये गोंधळ झाला. यांना आता ‘मयूर सिंहासन द्याचं का?’ असं म्हणत सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जातेय.

रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये ज्या ठिकाणी मंत्र्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तिथे काचेची भिंत होती. समोर इतर व्हीआयपी प्रेक्षक उभे राहून सामन्याचा आनंद लुटत होते. ज्या ठिकाणी मंत्री बसले होते, तिथे टीव्ही होता, ज्याद्वारे ते सामना पाहू शकत होते. क्रिकेट सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाऊन तिथे टीव्हीवर सामना पाहावा लागतोय, या गोष्टीवर मंत्री साहेब भडकले. ते इतका संतापले की सामना मध्येच सोडून स्टेडियमच्या बाहेर पडले.

डॉ. मनमोहन सिंग यांना दिली होती आदरांजली !

तसं, हाफिझुल अन्सारींनी वाद निर्माण करण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या महिन्यात एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जिवंत असताही आदरांजली दिली होती. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी एक मिनिट मौनही पाळले होते. मात्र, चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी माफी मागितली होती.

इतर बातम्या-

UP Elections | अखिलेश यादव आणि संजय सिंह यांच्यात यूपी विधानसभा निवडणुकीची जागावाटपासाठी बोलणी सुरू ?

LPG वर सबसिडी लवकरच सुरू होणार, 303 रुपयांची सूट मिळणार, कसा फायदा मिळवाल?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.