UP Elections | अखिलेश यादव आणि संजय सिंह यांच्यात यूपी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची बोलणी सुरू

अलीकडच्या काळात संजय सिंह आणि अखिलेश यादव यांच्यातील ही तिसरी भेट होती. याआधी सोमवारी मुलायम सिंह यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली होती. राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षात युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

UP Elections | अखिलेश यादव आणि संजय सिंह यांच्यात यूपी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची बोलणी सुरू
Akhilesh Yadav, Sanjay Singh (file photo)


लखनौः उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भेटीगाठी सुरूच आहेत. बुधवारी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली. या भेटीबाबत राजकीय चर्चा सुरू झाली आहे की यूपीमध्ये आम आदमी पार्टी आणि समाजवादी पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याचा तयारीत आहेत? का ही भेट आणखी काही कारणासाठी होती?

आम आदमी पार्टीने बुधवारी सांगितले की त्यांनी उत्तर प्रदेशातील 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षासोबत जागावाटपासाठी बोलणी सुरू केली आहेत.  संजय सिंह म्हणाले की, दोघांमध्ये उत्तर प्रदेशातील समस्यांवर धोरणात्मक चर्चा झाली आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारपासून उत्तर प्रदेशला कशी मुक्त देता येईल, याची चर्चा झाली. मिळालेल्या महितीनुसार, आपने शहरी भागातल्या तीन डझन जागा एसपीकडे मागितल्यात.

उत्तर प्रदेशात भाजपला खरा लढा देणारा समाजवादी पक्ष हा एकमेव राजकीय पक्ष आहे. काँग्रेस आणि सपा एकत्र लढणार नाहीत, हे स्पष्ट केले गेले आहे. त्यामुळे समाजवादी पक्ष इतर कोणत्या पक्षाशी युती करेल का, असा सवाल अनेकांकडून केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी आपचे प्रभारी संजय सिंह बुधवारी लखनऊमधील ‘जनेश्वर ट्रस्ट’च्या कार्यामासाठी उपस्थित होते, जीथे त्यांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षात युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अलीकडच्या काळात संजय सिंह आणि अखिलेश यादव यांच्यातील ही तिसरी भेट होती. याआधी सोमवारी मुलायम सिंह यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी मुलायम सिंह यांना पुष्पगुच्छ देताना त्यांचे छायाचित्र ट्विट केले आणि लिहिले, ‘उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, भारतीय राजकारणाचे नेते माननीय मुलायम सिंह यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. याशिवाय, संजय सिंह यांनी जुलैमध्ये अखिलेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त देखील भेट घेतली होती, तेव्हा त्यांनी अखिलेश यादव यांचे कौतुक केले होते आणि त्यांच्या आणि अरविंद केजरीवाल यांच्यात किती साम्य आहे हे दिखील सांगितले होते.

त्यांच्या वारंवार भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात, हे दोन पक्ष निवडणुकीसाठी एकत्र येणार की एकमेकांना पाठिंबा देण्याची घोषणा करणार, अशा चर्चा रंगतात. अखिलेश यादव यांनी यापूर्वीही आपण काँग्रेससोबत गेल्यावेळी युती करून चूक केली अस सांगितलं होत. यातून धडा घेत यावेळी छोट्या पक्षांशी हातमिळवणी करून आगामी निवडणुकीत उतरणार असल्याची तयारी त्यांनी दाखवली होती.

इतर बातम्या

ऐतिहासिक वादग्रस्त कृषी कायदे अखेर रद्द, कॅबिनेट बैठकीत मंजूरी, 29 नोव्हेंबरला विधेयक सादर होणार

INS विशाखापट्टणम नंतर आता INS Vela भारतीय नौदलात सामील होणार आहे, काय आहेत या पाणबुडीची वैशिष्ट्ये?

मुख्यमंत्रिपदाची तात्पुरते सूत्रे कुणाच्या हाती?; सोशल मीडियावर चर्चा आणि तर्कांचा पूर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI