दलित चळवळीतील ‘चंद्रूं’चा शुक्रवारी सन्मान, डॉ आंबेडकर मालिकेतील सुभेदार रामजीबाबा शुक्रवारी घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत!

येत्या शुक्रवारी 26 नोव्हेंबर रोजी देशभरात संविधान दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने ‘जयभीम’ चित्रपटातील सध्या गाजत असलेल्या ‘चंद्रू’ वकिलाच्या व्यक्तिरेखेच्या पार्श्वभूमीवर दलित चळवळीतील सेवाभावी वकिलांचा घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरतर्फे खास सन्मान सोहळा पार पडणार आहे.

दलित चळवळीतील ‘चंद्रूं’चा शुक्रवारी सन्मान, डॉ आंबेडकर मालिकेतील सुभेदार रामजीबाबा शुक्रवारी घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत!
dr. babasaheb ambedkar
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 5:46 PM

मुंबई: येत्या शुक्रवारी 26 नोव्हेंबर रोजी देशभरात संविधान दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने ‘जयभीम’ चित्रपटातील सध्या गाजत असलेल्या ‘चंद्रू’ वकिलाच्या व्यक्तिरेखेच्या पार्श्वभूमीवर दलित चळवळीतील सेवाभावी वकिलांचा घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरतर्फे खास सन्मान सोहळा पार पडणार आहे. 26 नोव्हेंबर रोजीच हा सत्कार सोहळा पार पडणार आहे. ‘स्टार प्रवाह’वरील डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेत पितामह सुभेदार रामजी आंबेडकर यांची भूमिका साकारलेले अभिनेते मिलिंद अधिकारी यांच्या हस्ते वकिलांना गौरवण्यात येणार आहे. यावेळी अ‍ॅड. कीर्ति ढोले, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

गौरविण्यात येणाऱ्या वकिलांमध्ये अ‍ॅड. किरण चन्ने, अ‍ॅड. आशाताई लांडगे, अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे, अ‍ॅड. अँजेलिना ढोले, अ‍ॅड. राजेश करमरकर, अ‍ॅड. सिद्धांत सरवदे, अ‍ॅड. अनिल वाघमारे, अ‍ॅड. अनार्या हिवराळे, अ‍ॅड. अमित कटारनवरे, अ‍ॅड. संतोष कोकाटे, अ‍ॅड. जितेन तुपे, अ‍ॅड. जीवन लोंढे, अ‍ॅड. हर्षू साळवे, अ‍ॅड. मिलिंद गायकवाड, अ‍ॅड. मिलिंद पाखरे, अ‍ॅड. निलेश गरूड, अ‍ॅड. रोहित गांगुर्डे, अ‍ॅड. केसरीमल भोईर आदींचा समावेश आहे. या सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रांतील काही समर्पित नामवंताचाही प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. त्यात प्रख्यात क्षयरोग चिकित्सक डॉ. राजेंद्र ननावरे, डॉ. राजेंद्र जयस्वाल, शाहीर संभाजी भगत, शाहीर प्रसाद आंतरवेलीकर यांचाही गौरव करण्यात येणार आहे.

कार्यकर्त्यांची बैठक

स्थानिक संविधान गौरव समिती आणि केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या डॉ आंबेडकर फाऊंडेशनने संयुक्तरित्या हा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे. त्याची घोषणा संविधान गौरव समितीच्या एका बैठकीनंतर निमंत्रक डॉ. हरीष आहिरे यांनी एका पत्रकाद्वारे आज केली. ते ज्येष्ठ रिपब्लिकन नेते आणि डॉ आंबेडकर फाऊंडेशनचे सदस्य आहेत. संविधान समितीच्या या बैठकीला चिंतामण गांगुर्डे, बापू जगधणे, अंकुश कांबळे, डी. एम. चव्हाण, श्रीधर साळवे, काका गांगुर्डे, नंदू साठे, वसंत आगळे यांच्यासह अनेक स्थानिक प्रतिष्ठित कार्यकर्ते उपस्थित होते.

पँथर नेत्यांच्या सहचारिणींचाही सत्कार

या संविधान दिन समारंभात दिवंगत लढाऊ पँथर नेत्यांच्या सहचारिणींचाही सत्कार करण्यात येणरा आहे. त्यानुसार दीक्षा राजा ढाले, मल्लिका नामदेव ढसाळ, सुषमा भाई संगारे, उषाताई बाबूराव शेजवळ, शशिकला मनोहर जाधव यांना महावस्त्र आणि सन्मान निधी प्रदान करून गौरवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या:

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत मोठा निर्णय? सरकारकडून संध्याकाळी घोषणेची शक्यता

रेशन दुकानांमध्ये 5 किलो गहू अन् तांदुळ मोफत योजना सुरुच रहाणार- मोदी सरकारचा निर्णय

मोठी बातमी | काँग्रेसचा स्वबळाचा नारा; महापालिका, झेडपी, पंचायत समिती निवडणुकीत एकला चलो रे!

Non Stop LIVE Update
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.
लय फडफड करत होता, बर्फात जाऊन झोपला की.., जरांगेंचा रोख नेमका कोणावर?
लय फडफड करत होता, बर्फात जाऊन झोपला की.., जरांगेंचा रोख नेमका कोणावर?.
ओमराजे निंबाळकर,अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस; प्रकरण काय?
ओमराजे निंबाळकर,अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस; प्रकरण काय?.