Israel Iran War : 94 देशांनी ठरवलं जो बॉम्ब वापरायचा नाही, तोच बदनाम बॉम्ब इराणने इस्रायलवर टाकला? किती घातक आहे हा बॉम्ब?

Israel Iran War : इराण-इस्रायल युद्ध भीषण वळणावर आहे. दोन्ही देशांकडून परस्परांवर जोरदार हल्ले सुरु आहेत. इराणने इस्रायलवर बदनाम बॉम्बने हल्ला केला आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा बदनाम बॉम्ब काय आहे? किती घातक आहे? जगातल्या 94 देशांनी युद्धात कधी हा बॉम्ब वापरायचा नाही, असं का ठरवलेलं?.

Israel Iran War : 94 देशांनी ठरवलं जो बॉम्ब वापरायचा नाही, तोच बदनाम बॉम्ब इराणने इस्रायलवर टाकला? किती घातक आहे हा बॉम्ब?
Iran hit Israel
| Updated on: Jun 20, 2025 | 12:47 PM

इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यातून मोठा खुलासा झाला आहे. इराणने मिसाइलसोबत क्लस्टर बॉम्बने हल्ला केला, असं इस्रायली अधिकाऱ्याने सांगितलं. त्यामुळे इस्रायलमध्ये जास्त नुकसान होत आहे. एकाचवेळी अनेक ठिकाणं नष्ट करण्यासाठी इराण या क्लस्टर बॉम्बचा वापर करत आहे. जगात हा क्लस्टर बॉम्ब खतरनाक आणि बदनाम बॉम्ब मानला जातो. या बॉम्बच्या वापरावर बंदी आहे. इराणने या बॉम्बने हल्ला केल्याने इस्रायलला सुद्धा धक्का बसला आहे. आतापर्यंत इराणने केलेल्या हल्ल्यात इस्रायलमध्ये 25 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

इराणकडून इस्रायलवर बॅलेस्टिक आणि हायपरसोनिक मिसाइलने हल्ले सुरु आहेत. या मिसाइलमध्ये इराणी अधिकारी क्लस्टर बॉम्ब फिट करत आहेत. इराणी बॅलेस्टक मिसाइल हवेत 7000 मीटर उंचीवर 20 वेगवेगळ्या रॉकेट्समध्ये विभागलं जातं. त्यानंतर 20 छोटे-छोटे मिसाइल्स 8 किलोमीटरच्या रेडियसला टार्गेट करतात. त्यामुळेच इस्रायलमध्ये मोठा विद्ध्वंस सुरु आहे.

किती देशांनी ठरवलं हा बॉम्ब वापरायचा नाही?

दुसऱ्या जागतिक युद्धाच्यावेळी क्लस्टर बॉम्बचा वापर झाला होता. वियतनाम युद्धाच्यावेळी अमेरिकेने या बॉम्बच्या माध्यमातून मोठ नुकसान केलं होतं. शीत युद्धाच्या काळातही क्लस्टर बॉम्बची चर्चा होती. इराण-इराक युद्धाच्यावेळी सुद्धा क्लस्टर बॉम्बचा मोठ्या प्रमाणात वापर झाला होता. त्यानंतर सगळ्या जगात या बॉम्बची चर्चा झाली. 2008 साली 94 देशांनी एका करारावर स्वाक्षरी केली. त्यात युद्धात या क्लस्टर बॉम्बचा वापर करायचा नाही, हे ठरवलं.

9 अणूबॉम्ब बनवण्याइतपत यूरेनियम संवर्धन

इराण आणि इस्रायलमधील चालू लढाईचा मुद्दा अणूबॉम्ब आहे. इस्रायलला इराणला अणूबॉम्ब बनवण्यापासून रोखायचं आहे, म्हणून ते इराणवर हल्ला करतायत. इराण सतत युरेनियम संवर्धन वाढवतोय, असं इस्रायलच म्हणणं आहे. जास्त प्रमाणत युरेनियम संवर्धन केल्यास ते सहज अणूबॉम्ब बनवू शकतात.

इस्रायलने अलीकडेच IEIA रिपोर्टचा हवाला दिला होता. या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलेला की, इराणने 9 अणूबॉम्ब बनवण्याइतपत यूरेनियम संवर्धन केलय. मध्य पूर्वेत इस्रायल आणि इराण परस्परांचे कट्टर विरोधक देश आहेत.