AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणच्या नव्या रुपाने खळबळ, थेट अमेरिकेच्या जहाजावर मिसाईल डागल्या; आता नवे युद्ध…जग हादरले!

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम आता संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. कारण इराणने आता थेट अमेरिकेच्या बोटीवर थेट हल्ला केला आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर आता जगभरात खळबळ उडाली आहे.

इराणच्या नव्या रुपाने खळबळ, थेट अमेरिकेच्या जहाजावर मिसाईल डागल्या; आता नवे युद्ध...जग हादरले!
iran attack american shipImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 04, 2026 | 7:11 PM
Share

America Iran War : गेल्या अनेक दिवसांपासून इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचा संपूर्ण जगाने धसका घेतलेला आहे. हे युद्ध थांबावे यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानातील इस्लामाबदमध्ये एक बैठक झाली. परंतु या बैठकीत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. या बैठकीनंतर मात्र अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव जास्तच वाढला आहे. अमेरिकेने इराणी बंदर तसेच होर्मुझच्या खाडीतील सर्वच बंदरांवर नाकेबंदी सुरू केली आहे. तर दुसरीकडे इराणने मात्र ही नाकेबंदी मान्य नसल्याचं म्हटलं आहे. दोन्ही देशांच्या या भूमिकेमुळे जग मात्र तेलसंकटाने होरपळत आहे. असे असतानाच आता जगाला हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविराम संपुष्टात आला असून इराणने अमेरिकेच्या बोटीवरच थेट हल्ला केला आहे.  इराणे अमेरिकन जहाजांवर थेट क्षेपणास्त्र डागले आहेत, असे बोलले जात आहे.

नेमकी काय माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविरामाचा करार आता मोडण्यात आला आहे. होर्मुझच्या खाडीत इराणे हा करार मोडला असून थेट अमेरिकन जहाजावर हल्ला केला आहे. अमेरिकेने या सामुद्रधुनीत आजपासून ‘मिशन फ्रिडम’ सुरू केले होते. त्यानंतर आता प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकन बोटीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर आता इराणमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. इराणच्या या हल्ल्यानंतर आता इराण-अमेरिका यांच्यातील महाभयंकर युद्धाला नव्याने सुरुवात झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

युद्ध आणखी भडकणार का?

इराणने अमेरिकन बोटीवर हल्ला केल्यानंतर हल्ल्याच्या ठिकाणी स्पीडबोट पाहायला मिळाली. अमेरिकेकडून होर्मुझच्या खाडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर काहीही झालं तर या सामुद्रधुनीचे नियंत्रण आम्ही कोणाकडेही देणार नाही, अशी भूमिका इराणने घेतली आहे. दुसरीकडे अमेरिकेने मात्र आमच्या बोटीवर कुठलाही हल्ला झालेला नाही, असे अमेरिकेने सांगितले आहे. त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत नेमके काय होणार? याकडे जगाचे लक्ष लागले आहे. दोन्ही देशांत युद्ध भडकलेच तर भविष्यात आणखी मोठे तेलसंकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं