आणखी एक शक्तिशाली देश ट्रम्प यांच्या दबाव तंत्रापुढे झुकला, घेतला मोठा निर्णय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या अनेक देशांवर निर्बंध घातले आहेत, या निर्बंधांचा मोठा फटका आता या देशांना बसत असल्याचं दिसून येत आहे.

आणखी एक शक्तिशाली देश ट्रम्प यांच्या दबाव तंत्रापुढे झुकला, घेतला मोठा निर्णय
| Updated on: Aug 18, 2025 | 7:03 PM

इस्रायल आणि इराणमध्ये बारा दिवस भीषण युद्ध झालं, या युद्धामध्ये दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालं आहे. या दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाल्याच्या घटनेला आता तीन महिने होऊन गेले आहेत. त्यानंतर आता इराणनं आपल्या अणु कार्यक्रमाबाबत दोन पाऊलं माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माईल बघाई यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही अणु कार्यक्रमाबाबतचे नियम मानण्यास तयार आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी अमेरिकेसमोर एक अट देखील ठेवली आहे, त्याबदलल्यात अमेरिका आणि युरोपीयन युनियने आमच्यावर घातलेले अयोग्य आर्थिक निर्बंध उठवावे लागतील, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

जर अमेरिकेने आमच्यावर घातलेले प्रतिबंध हटवले तर आम्ही अणु कराराचं पालन करण्यास तयार आहोत, असं यावेळी इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे, मात्र तुम्ही जर मदत केली नाही तर आमच्याकडून देखील सहकार्याची अपेक्षा ठेवू नका असंही यावेळी इराणकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आमची तीन युरोपीयन देशांसोबत चर्चा सुरू आहे, आणि इतर युरोपीयन देशांसोबत चर्चेसाठी देखील आमचे दरवाजे खुले आहेत. अजून आम्ही कोणत्या ठोस निर्णयापर्यंत पोहोचलो नाहीत, मात्र जर अमेरिकेनं इराणवर घातलेले प्रतिबंध हटवले तर आम्ही त्यादृष्टीने निर्णय घेऊ शकतो, असं बघाई यांनी म्हटलं आहे.

इस्रायल आणि अमेरिकेकडून झालेल्या हल्ल्यानंतर आता हे खूप गरजेच झालं आहे की, IAEA आणि आमच्यामध्ये योग्य ताळमेळ असला पाहिजे, जगात पहिल्यांदाच असं घडलं की, एखाद्या देशाच्या शांततेच्या मार्गानं सुरू असलेल्या अनु केंद्रांवर हल्ला झाला आहे. त्यामुळेच आम्हाला आमची सुरक्षा महत्त्वाची वाटत आहे.

इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध झालं. बारा दिवस चाललेल्या या युद्धामध्ये दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. याच युद्धकाळामध्ये अमेरिकेकडून इराणच्या दोन अणू केंद्रांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर इराणने देखील आक्रमक भूमिका घेतली होती, दरम्यान त्यानंतर आता इराण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे.