जगात हाहाकार! होर्मुजनंतर इराणचा नवा दम, अनेक देश संकटात, भारतालाही थेट..
इराण आणि अमेरिका युद्धात पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढले. जर इराणकडून झोप उडवणारी धमकी देण्यात आली. जर खरोखरच हे पाऊस इराणकडून उचलण्यात आले तर उपाशी राहण्याची वेळ काही देशांवर येऊ शकते.

इराण आणि अमेरिका युद्ध भयंकर स्थितीत आहे. मोठे हल्ले होत आहेत. या युद्धामुळे जागतिक पातळीवर चिंता वाढली. इराणकडून या युद्धात होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या उभी आहे. युद्ध भंयकर स्थितीत पोहोचलेले असताना इराणकडून आता थेट जगाची झोप उडवण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जग तणावात असताना आता इराणकडून इतके भयंकर संकेत देण्यात आले की, जगाच्या तोंडचे पाणी पळाले. अमेरिकेने अनेक आदळा आपट करूनही होर्मुज खाडी सुरक्षित करण्यात त्यांना यश मिळाले नाही. आता अमेरिकेच्या डोक्यात भयानक कट शिजत आहे. होर्मुजनंतर त्यांनी आपला मोर्चा दुसरी महत्वाची खाडी बाब अल मंदेब हिच्याकडे वळवला. जर इराणकडून ही खाडी बंद करण्यात आली तर जगातील अनेक देशांमध्ये अन्नाचा मोठा तुटवडा निर्माण होईल. अनेक देशात उपासमारीची वेळ येईल.
इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकेर गालिबाफ यांनी सोशल मीडियावर याबाबतच संकेत दिले आणि जगाची झोप उडवली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विचारेल की, जगातील किती तेल, गहू, तांदुळ, नैसर्गिक गॅस बाब अल मंदेबमधून जातो? नक्की कोणते देश आणि कंपन्या या मार्गावर अवलंबून आहेत, हे देखील विचारले पाहिजे.
इराणकडून हे संकेत अशावेळी आले आहेत, ज्यावेळी अमेरिकेने त्यांच्यावरील हल्ले अधिक घातक केली. जागतिक पुरवठा करणारा महत्वाचा स्त्रोत काबीज करण्याच्या विचारत इराण असल्याचे दिसत आहे. बाब-अल-मंदेब हा मार्ग लाल समुद्राला एडनच्या आखाती देशांसोबत जोडणारा महत्वाचा आणि मोठा समुद्री मार्ग आहे. त्याच्या एका बाजूला येमेन आणि दुसऱ्या बाजूला आफ्रिकेतील जिबूती देश आहे.
हा मार्ग 20 किलोमीटरचा आहे. ज्यातून जहाजे सुएझ कालव्याकडे आणि नंतर युरोपला जातात. याचा अर्थ असा की, आशियातून युरोपला होणाऱ्या व्यापाराचा एक मोठा भाग या मार्गावर अवलंबून आहे. तोच इराण कोणत्याही क्षणी बंद करू शकते. या मार्गाने मोठी वाहतूक केली जाते. उद्या जर हा मार्ग बंद झाला तर अनेक देशांचे खान्याचे वांदे होऊ शकतात. भारतासाठी देखील हा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे.