AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel War: आता इस्रायलची खैर नाही, इराणच्या ताफ्यात खतरनाक शार्पशूटर्स सामील, रडारवर कोण?

इराण शार्पशूटर्सची एक फौज उभी करत आहे. हे शूटर्स गणवेशात नसतील तसेच कोणत्याही सैन्याचा भाग नाहीत. मात्र ते आता इराणसाठी काम करणार आहेत.

Iran Israel War: आता इस्रायलची खैर नाही, इराणच्या ताफ्यात खतरनाक शार्पशूटर्स सामील, रडारवर कोण?
iran sharp shooters
| Updated on: Jun 21, 2025 | 5:12 PM
Share

इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु आहे. रोज दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. अशातच आता इराण शार्पशूटर्सची एक फौज उभी करत आहे. हे शूटर्स गणवेशात नसतील तसेच कोणत्याही सैन्याचा भाग नाहीत. या युरोपमधील धोकादायक गुन्हेगारी टोळ्या आहेत. या टोळ्यांकडे इराणने आपल्या शत्रूंची नावे सोपवली आहेत. त्यामुळे आता या टोळ्या इराणसाठी काम करणार आहेत.

स्वीडनमधील सरकारी ब्रॉडकास्टर SVT च्या एका डॉक्युमेंट्रीत याबाबत माहिती समोर आली आहे. इराणच्या गुप्तचर संस्था युरोपच्या गुन्हेगारी टोळ्यांना पैसे आणि मदत देत आहेत, ज्यामुळे ते इराणच्या शत्रूंवर हल्ला करू शकतील. या टोळ्यांच्या निशाण्यावर लंडनस्थित पर्शियन न्यूज चॅनेल इराण इंटरनॅशनल आहे.

SVT च्या अहवालानुसार, इराणी एजंटांनी स्वीडनमधील अनेक कुख्यात गुंडांशी संपर्क साधला, त्यापैकी सर्वात प्रसिद्ध रवा माजिद हे आहे, ज्याला ‘कुर्दिश फॉक्स’ म्हटले जाते. हा तोच व्यक्ती आहे जो फॉक्सट्रॉट टोळीचा नेता आहे. ही टोळी स्वीडनमध्येहोणाऱ्या बॉम्बस्फोट, गोळीबार आणि खून यासाठी कुप्रसिद्ध आहे.

फॉक्सट्रॉट टोळीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. 2023 च्या सुरुवातीला जेव्हा माजिद इराणला गेला तेव्हा त्याला दोन पर्याय देण्यात आले होते, एकतर तुरुंगात जाणे किंवा इराणी सरकारसाठी काम करणे. माजिदने दुसरा मार्ग निवडला आणि त्याने स्टॉकहोममधील इस्रायली दूतावासावर ग्रेनेड हल्ला केला.

इराणच्या निशाण्यावर कोण?

लंडनमधील इराण इंटरनॅशनल चॅनल इराणी सरकारवर टीका करण्यासाठी ओळखले जाते. या चॅनलच्या पत्रकारांवर पूर्वी पाळत ठेवली जात होती, तसेच धमक्या दिल्या जात होत्या. मात्र आता शार्पशूटर्सकडे चॅनलवर वचक ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच इस्रायली दूतावास, युरोपमधील ज्यू धार्मिक स्थळे (सिनेगॉग) देखील या टोळ्यांच्या निशाण्यावर असणार आहे.

या टोळ्या लॉरेन्स बिश्नोईपेक्षा जास्त धोकादायक

SVT ने सादर केलेल्या अहवालानुसार, सध्या स्वीडनमधील सुमारे 14 हजार लोक थेट या गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित आहेत. तसेच सुमारे 48 हजार लोक त्यांच्याशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेले आहेत. भारतातील लॉरेन्स बिश्नोईच्या नेटवर्कमध्ये 700 हून अधिक सदस्य असल्याचे म्हटले जाते, परंतु स्वीडनचे टोळी नेटवर्क त्यापेक्षा खूपच संघटित, धोकादायक आहे. याचा वापर आता इराणसारखे देश करत आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.