इराणच्या शक्तीत मोठी वाढ, बलाढ्य देशाचा थेट पाठिंबा; अमेरिका, इस्रायलचं टेन्शन वाढलं
इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, याचदरम्यान मोठी बातमी समोर येत आहे. इराणच्या शक्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे. बलाढ्य देशानं थेट पाठिंबा जाहीर केला आहे.

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, याचदरम्यान अमेरिकेनं इराणच्या तीन अणू केंद्रांवर हल्ला केला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण पूर्णपणे बॅकफूटवर आल्याचं वाटत होतं, मात्र याचदरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानंतर आता इराण मदतीसाठी आपले मित्र असलेल्या रशिया आणि चीनकडे मोठ्या अपेक्षणं बघत आहे. इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू असतानाच इराणचे परराष्ट्र मंत्री रशियाच्या दौऱ्यावर आहेत. इराणच्या या प्रयत्नाला मोठं यश आलं आहे. रशियाच्या सरकारी प्रवक्त्यानं म्हटलं आहे की, रशिया वेगवेगळ्या प्रकारे इराणची मदत करण्यासाठी तयार आहे, आता इराण आमच्याकडे नेमकी काय मदत मागतो त्यावर ते अवलंबून असेल.
रशियानं या युद्धाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता हे सर्व यावर अवलंबू आहे की, इराणला काय वाटतं? आम्ही मध्यस्थीसाठी प्रयत्न करण्यास देखील तयार आहोत. मात्र जर इराणने आमच्याकडे लष्करी मदत मागितली आणि रशियाचे सैन्य या युद्धात उतरले तर या युद्धाच स्वरुप फार स्फोटक असेल असा इशाराही यावेळी रशियाकडून देण्यात आला आहे, रशियानं इराणला पाठिंबा दिला आहे.
क्रेमलिनच्या प्रवक्त्यानं पुढे बोलताना म्हटलं आहे की, आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे, आम्ही इराणसोतब आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात या सर्व पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये इराण- इस्रायल युद्धाचा मुद्दा केंद्रस्थानी होता.
पुतिन अराघची यांना काय म्हणाले?
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बस अराघची हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी युद्धाबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्यासोबत आज मॉस्कोमध्ये चर्चा केली. यावेळी बोलताना इराणवर सध्या सुरू असलेले हल्ले हे निराधार असल्याचं पुतिन यांनी म्हटलं आहे. दरम्यान यापूर्वी देखील इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा रशियाकडून निषेध करण्यात आला होता. जर या युद्धात रशियानं उडी घेतली तर इराणची ताकद वाढणार आहे, इराणचं बळ वाढल्यामुळे अमेरिका आणि इस्रायलची डोकेदुखी वाढू शकते.
