इस्रायलच्या मिसाईल्स संपल्या, आता इराण बाहेर काढणार ती शस्त्रं? अमेरिकेतून मोठा रिपोर्ट!

Iran Israel War : इस्रायलला सध्या शस्त्रं कमी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी 10 ते 12 दिवसांत काहीही होऊ शकतं, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

इस्रायलच्या मिसाईल्स संपल्या, आता इराण बाहेर काढणार ती शस्त्रं? अमेरिकेतून मोठा रिपोर्ट!
| Updated on: Jun 18, 2025 | 6:21 PM

Iran Israel War Update : इस्रायल आणि इराण यांनी आतापर्यंत एकमेकांवर हल्ला करण्यासाठी अनेक संहारक शस्त्रांचा वापर केला आहे. युद्धाच्या सहाव्या दिवशीही इराण आणि इस्रायल यांचे एकमेकांवरील हल्ले चालूच आहेत. असे असतानाच आता अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तापत्राने एक महत्त्वाचे वृत्त प्रकाशित केले आहे. या रिपोर्टमुळे इस्रायलमध्ये नेमकं काय चाललंय? हे समोर आलं आहे. इस्रायल देश सध्या इराणच्य बॅलिस्टिक मिसाईल्सचे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता या देशांची एकमेकांविरोधात लढण्यासाठी किती ताकद शिल्लक राहिली आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. वाशिंग्टन पोस्टमध्ये याचीच माहिती देण्यात आलेली आहे. या माहितीनुसार इस्रायलकडे आगामी 10 ते 12 दिवस पुरतील एवढ्याच मिसाईल्स शिल्लक राहिल्या आहेत.

400 मिसाईल्स लॉन्च केल्या

वॉशिंग्टन पोस्टनुसार इराणकडे साधारण 2000 शक्तीशाली मिसाईल्स आहेत. या मिसाईल्स 1500 किमीपर्यंतच्या लक्ष्यावर हल्ला करू शकतात. शुक्रवारी मात्र इस्रायलने केलेल्या हल्ल्यात या मिसाईल्सपैकी बऱ्याच मिसाईल्स नष्ट झाल्या आहेत. इराणने आपल्या उर्वरित शस्त्रभांडारापैकी साधारण 400 मिसाईल्स लॉन्च केल्या आहेत. त्यामुळे आता इराणकडे असलेली बरीच शस्त्र संपली आहेत, असं इस्रायलचं मत आहे.

इस्रायलकडे डिफेन्स मिसाईल्सचा तुटवडा

गेल्या काही दिवसांपासून इस्रायल हा इराणवर सातत्याने हल्ले करत आहे. त्यामुळे आता इस्रायकडे असणारी क्षेपणास्त्रंदेखील संपत येत आहेत. त्यामुळे आगामी फक्त 10 ते 12 दिवसांसाठीच इस्रायल इराणला रोखू शकतो. त्यामुळे इराणला रोखण्यासाठी इस्रायलला अमेरिकेची मदत घ्यावीच लागणार आहे. इस्रायलकडच्या डिफेन्स मिसाईल्स संपत आल्यामुळे इराणकडून होणाऱ्या हवाई हल्ल्यांना रोखण्यात इस्रायलला मर्यादा येतील, असंही वॉशिंग्टन पोस्टमध्ये सांगण्यात आलंय.

क्षेपणास्त्रांचा तुटवडा ठरणार शस्त्रसंधीचं कारण?

व्हर्जिनियामध्ये मिसाईल डिफेन्स अॅडव्होकसी अलायन्सशी संबंध असलेले इस्रायली क्षेपणास्त्रांची माहिती असणारे ताल इनबार यांनीही क्षेपणास्त्रांचा तुटवडा आणि शस्त्रसंधी याविषयी माहिती दिली आहे. 2014 साली एअर डिफेन्सर संपल्यामुळे इस्रायलने हमासकडे युद्ध थांबवण्याची मागणी केली होती. इंटरसेप्टरची उपलब्धता हा इस्रायसाठी फार गंभीर आणि संवेदनशील विषय आहे. त्यामुळे इंटरसेप्टर्सची कमतरता हे इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबण्याचं कारण असू शकतं असं इनबार यांनी सांगितलंय.ा

इराणने हल्ले चालू ठेवले तर…

इराण-इस्रायल यांच्यातील युद्धाची माहिती ठेवणाऱ्या तज्ज्ञांच्या मते इराणच्या भूमिगत भांडारामध्ये अजूनही हजारो क्षेपणास्त्रं आहेत. इराणने आपले हल्ले चालूच ठेवले तर इस्रायल आपले गुडघे टेकू शकते, असे या तज्ज्ञांना वाटते. पण दुसरीकडे इराणकडे असणारी क्षेपणास्त्रं तसेच अन्य शस्त्रं झपाट्याने संपत आहेत. त्यामुळे आगामी काळात दोन्ही देशांत शस्त्रसंधी घडून येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.