AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचा पाकिस्तानला मोठा दणका, तारीख ठरलीच नाही, थेट खुलासा, सोमवारी..

इराण आणि अमेरिका युद्धात जग वैतागले आहे. स्थिती गंभीर होत आहे. त्यामध्येच मोठा दावा केला जात होता की, पाकिस्तानमध्ये सोमवारी इराण आणि अमेरिका युद्धबंदीची बैठक होणार आहे. आता इराणकडून यावर भाष्य करण्यात आले.

इराणचा पाकिस्तानला मोठा दणका, तारीख ठरलीच नाही, थेट खुलासा, सोमवारी..
Iran
| Updated on: Apr 19, 2026 | 12:16 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाच्या युद्धविराम बैठकीपूर्वी इराणकडून मोठे भाष्य करण्यात आले. इराणचे उपपरराष्ट्र मंत्री सईद खातिबजादह यांनी दुसऱ्या युद्धविराम बैठकीची कोणतीही तारीख ठरली नसल्याचे म्हटले. दुसरीकडे चर्चा आहे की, सोमवारी म्हणजेच उद्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका युद्धाची बैठक होणार आहे. मात्र, आता कोणीही तारीख ठरली नसल्याचे इराणकडून सांगण्यात आले. शत्रूवर विश्वास ठेऊ शकत नसल्याचेही इराणने म्हटले. अल जजीराच्या रिपोर्टनुसार, सईद खातिबजादह यांनी म्हटले की, अमेरिका अवास्तव मागण्या करत असेल तर त्याला मान्य करणे शक्य नाही. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगेर गाफिबफ यांनी म्हटले की, इराण कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहे. मुळात म्हणजे आपल्या शत्रूंवर अजिबात विश्वास ठेवत नाहीत. कारण आम्ही बैठकीला बसल्यानंतरही आमच्यावर हल्ला होऊ शकतो.

आमचे सैन्य पूर्ण प्रकारे तयार आहे. सोमवारी इस्लामाबादमध्ये बैठकीची शक्यता फार कमी असल्याचे इराणच्या बोलण्यावरून दिसत आहेत. पाकिस्तान या युद्धात मध्यस्थी करत आहे. पहिली युद्धबंदी करारची बैठक पाकिस्तानमध्ये झाली. दुसरीही बैठक तिथेच होणार असल्याचे संकेत आहेत. हेच नाही तर सोमवारी ही बैठक होणार असल्याची चर्चा होती.

पण नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी बैठक होईल की नाही स्पष्ट नाही. इराणकडून स्पष्ट करण्यात आले की, दुसऱ्या बैठकीची तारीख ठरलेली नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर युद्धबंदी करार करायचे आहेत. त्याकरिता तसे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी दावाही केला की, युद्धबंदी कराराच्या आम्ही अत्यंत जवळ आहोत.

दोन्ही देशांनी आता समोरासमोर बसून चर्चा करणे आवश्यक आहे. पण इराण काही गोष्टींवर ठाम आहे. इराणकडून अमेरिकेच्या नाकेबंदीचा विरोध करण्यात आला. मात्र, जोपर्यंत पुर्ण युद्धबंदी करार होणार नाहीत, तोवर माघार घेणार नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. इराण आणि अमेरिका युद्ध लवकरात लवकर थांबले पाहिजे, ही जगाची इच्छा आहे. या युद्धात जग होरपळत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...