AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण युद्धाने नवा धोका वाढला, शॅडो वॉरची भीती, तपास यंत्रणा झाल्या अलर्ट

इराण युद्धामुळे दहशतवादी हल्ल्यांचा धोका अचानक वाढला आहे. सुफियान ग्रुपने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ड्रोन, जाळपोळ आणि प्रॉक्सी हल्ल्यांचा इशारा देण्यात आला आहे.जेथे ज्यू लोकांचा वावर आहे तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

इराण युद्धाने नवा धोका वाढला, शॅडो वॉरची भीती, तपास यंत्रणा झाल्या अलर्ट
iran shadow war
| Updated on: Apr 18, 2026 | 8:33 PM
Share

इराण युद्धामुळे युके आणि संपूर्ण युरोपात आता अतिरेकी हल्ल्याचा धोका वाढला आहे. एका नवीन सुरक्षा अहवालात म्हटले आहे की युद्धाचे स्वरुप आता “शॅडो वॉरचे” रुप घेऊ शकते. म्हणजे थेट सरळ युद्ध करण्याऐवजी छोटे-छोटे हल्ले होऊ शकतात.उदा. आगी लावणे, ड्रोन हल्ले करणे आणि समुहावर हल्ला करणे अशा प्रकारचे हल्ले युरोपात होऊ शकतात.हा अहवाल ‘द सुफियान ग्रुप’ने दिला आहे. इस्रायल आणि लेबनॉन दरम्यान १० दिवसांचा संघर्ष विराम सुरु असताना हा अहवाल आला आहे.

या दरम्यान लेबनॉनच्या एका पार्कात पोलिसांना संशयित सामानाची छाननी केली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत होता. ज्यात दावा केला गेला होता की इस्रायल दुतावासात खतरनाक ड्रोनने हल्ला झाला आहे. मात्र, हा दावा चुकीचा निघाला. मात्र, सुरक्षा यंत्रणा सर्तक झाल्या आहेत.

IRGC ची खतरनाक प्लानिंग ?

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की इराणची इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्स (IRGC) युरोप आणि ब्रिटनमध्ये आपल्या समर्थक समुहाद्वारे हल्ले करु शकतो. यासाठी गुन्हेगारी टोळ्यांचा देखील वापर केला जाऊ शकतो, हल्ल्याचा तपास करता येऊ नये त्यामुळे ही शक्कल लढवली जाऊ शकते. अमेरिका, ज्यू समुदाय आणि इस्रायलशी संबंधित लोक वा संस्था यांना टार्गेट केले जाऊ शकते.

‘द सुफियान ग्रुप’ने हा अहवाल सादर केला आहे. ही एक ग्लोबल इंटेलिजन्स आणि सिक्युरिटी कन्सल्टन्सी आहे. जिचे प्रमुख अली सुफान आहेत. तिने दिलेल्या या अहवालात म्हटले आहे की असे हल्ले कमी खर्चात केले जाऊ शकतात. कारण त्याचा परिणाम मोठा होतो.कारण त्यामुळे लोकांमध्ये दहशत पसरते.

ब्रिटनमध्ये धार्मिक हिंसेत वाढ

ब्रिटनमध्ये आधीच ज्यूंच्या विरोधातील घटनात वाढ झाली आहे. अलिकडेच उत्तर लंडन येथे ज्यू समुदायाच्या एंब्युलन्स सेवेच्या चार गाड्यांमध्ये आग लावण्यात आली होती.ज्यास पोलिसांनी ज्यू विरोधी हल्ला म्हटले आहे. केंसिंग्टन गार्डनमध्ये संशयित साहित्य मिळाल्यानंतर संपूर्ण विभागाला बंद करण्यात आले आहे. पोलिसांच्या विशेष टीमने घटनास्थळी सापडलेल्या नमून्यांचा तपास केला. या भागात काम करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे की इराण युद्धामुळे ते आधी पेक्षा जास्त सर्तक आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...